दौंड तालुक्यात गणपती बाप्पा ला शांततेत निरोप

दिनेश पवार-दौंड (प्रतिनिधी):-

गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा एकात्मतेचा उत्सव,मराठी संस्कृती, अस्मिता जपणारा उत्सव,ही अस्मिता परदेशातही मराठी माणूस अभिमानाने जपत आहे,जात,पात,भेद,धर्म विसरून सर्व समाजातील जनता एकात्मिक बांधीलकी जपत हा उत्सव साजरा करतात,दरवर्षी बाप्पाचे आगमन जेवढया उत्स्फूर्तपणे केले जाते,हाच आनंद विसर्जनापर्यंत गणेश भक्ती ने हृदयात ठेवतात आणि भक्तिभावाने बाप्पाला निरोप दिला जातो,

परंतु यावर्षी या उत्सवावरती कोरोना च्या प्रादुर्भावाने विरजण पडले नि सर्वत्र उत्साहाने साजरा केला जाणारा उत्सव खबरदारी घेऊन,शासनाचे नियम पाळून, मास्क,सॅनिटायजर, सोशल डिस्टन्स पाळून साजरा करण्यात आला, शेवटच्या दिवशी ही ना,मिरवणूक, ना पारंपरिक वादये पण मोठ्या भक्तीने गर्दी न करता या बाप्पाला निरोप दिला पण प्रत्येक भक्ताने बाप्पाकडे एकच मागणे केले की जगावरती आलेले हे कोरोना संकट लवकर दूर होवू दे,नि पुढील वर्षी मोठ्या उत्साहात, स्वच्छ निरोगी वातावरणात परत ये,नक्कीच आपली ही आर्त हाक आपला लाडका गणपती बाप्पा एकूण घेईल आणि कोरोना सारख्या संकटाला नष्ट करेल हे मात्र नक्की.दौंड तालुक्यातील सर्वच गावांनी हा उत्सव अगदी शासनाला सहकार्य करत नियमांचे पालन करून साजरा केला.

गणेश विसर्जना दिवशी मात्र डॉक्टर, आरोग्य अधिकारी, पोलीस यांची रूपे घेऊन हा बाप्पा समजावरती आलेले संकट सोडवत होते, पोलीस रुपात विनामास्क कारवाई करून खबरदारी घेण्यासाठी आवाहन करत होते तर डॉक्टर रुग्णालयात सुट्टी न घेता कोविड चाचणी,रुग्णांवरती उपचार करत होते तर स्वच्छता दूत विसर्जन घाटावर स्वच्छता राखण्यासाठी आवाहन करत होते.

Previous articleकोरोना बाधित पत्रकारांसाठी शासकीय आणि धर्मदाय, खासगी रुग्णालयात राखीव बेडची व्यवस्था प्राधान्याने करण्याची मराठी पत्रकार परीषदेची मागणी
Next articleअवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्यांवर घोडेगाव पोलिसांची कारवाई