२५ वर्षीय पोलिस कर्मचाऱ्याने प्लास्मा दान करून एक नवा आदर्श केला निर्माण

लोणावळा शहर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या २५ वर्षीय पोलिस कर्मचारी राहुल खैरे याने आपल्याच एका कोरोना बाधित झालेल्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्याच्या वडिलांसाठी प्लास्मा दान करीत एक आदर्श निर्माण करून दिला आहे. 

राहुल खैरे याला २५ जून रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर कोरोनावर मात करीत राहुल खैरे हा ०५ ऑगस्ट रोजी पुन्हा आपल्या कर्तव्यावर रुजू झाला होता. दरम्यान चाकण येथे कार्यरत असणाऱ्या आपल्याच एका पोलीस कर्मचाऱ्याच्या वडिलांना प्लास्माची आवश्यकता असल्याचे त्याला कळलं. त्यावर क्षणाचाही विलंब न करता राहुल खैरे याने मंगळवारी प्लास्मा दान केले.

प्लास्मा डोनेशन डोनेशन म्हणजे नक्की काय आणि ते नेमकं कसं होतं याची ही प्रक्रिया समजून आवश्यक आहे. प्लास्मा डोनेशन डोनेशन हे साधारणतः कोरोना मधून बरे झाल्यावर २५ दिवसानंतर करता येते आणि ही रक्तदानासारखीच प्रक्रिया असते. रक्तदानात आपल्या शरीरातून जवळपास ३५० मिलीलीटर रक्त काढलं जातं. मात्र प्लास्मा डोनेशन मध्य साधारण ६५० मिलीलीटर, मात्र इतकं रक्त शरिरातून काढणं योग्य नसल्याने रक्तातले घटक काढून उर्वरित रक्त आपल्या शरिरात परत सोडलं जातं. ब्लड फ्लो चांगला असेल तर अक्षरक्ष: अर्ध्या तासात ही प्रक्रिया अगदी सहजपणे पूर्ण होते.

देशात, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढते आहे, तसेच अनेक रुग्ण बरे देखील होत आहेत..मात्र प्रकृती खालावलेल्या आणि मृत्यूशय्येवर असलेल्या रुग्णांसाठी प्लास्मा डोनेशन हे वरदान ठरु शकणार आहे. त्यामुळे प्लास्मा डोनेशनमुळे किमान काही रुग्णांचा जीव वाचू शकेल आणि ते मृत्यूच्या दाढेतून परत येऊन सर्वसामान्य माणसांप्रमाणे आपलं जीवन ही जगू शकतात. त्यामुळे कोरोना मुक्त झालेल्या व्यक्तींनी आपण या समाजाचे काही देणं लागतो या भावनेतून स्वतःहुन पुढं येत प्लास्मा दान करण्याची तयारी दाखवणं आवश्यक आहे.

Previous articleनिखिलभैया युथ फाउंडेशच्या गणेश मूर्ती संकलनाच्या आवाहनास नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद
Next articleबनावट नोटा देवून फसवणूक करणारी टोळी LCB आणि नारायणगांव पोलीसांकडून जेरबंद