मास्क न लावता फिरणाऱ्यांवर उरळी कांचन परिसरात पोलीसांची कारवाई

अमोल भोसले, उरुळी कांचन – प्रतिनिधी

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या सुचनेनुसार तसेच पुणे जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने विना मास्क फिरण्यास बंदी असून सोशल डिस्टन्स ठेवणे बंधनकारक आहे.

या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी याकरिता लोणी काळभोर (ता. हवेली) पोलीस स्टेशनच्या अंतर्गत उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी उरुळी कांचन, शिंदवणे, सोरतापवाडी, कोरेगावमुळ, या गावामध्ये ठिकठिकाणी विनामास्क फिरणारे नागरिक यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

नागरिकांनी सोशल डिस्टंस पाळावा, मास्क वापरावा, हात वेळोवेळी स्वच्छ करावे तसेच पुढील काही दिवस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन चौधरी यांनी नागरिकांना केले.

या कारवाई मध्ये पोलीस कर्मचारी सचिन पवार, सोमनाथ चितारे, महेंद्र गायकवाड, संदीप पवार, अमोल भोसले यांनी विशेष मेहनत घेतली. गेल्या चार दिवसात विशेष मोहिम अंतर्गत विना मास्क फिरणारे व सोशल डिस्टन्स न ठेवणाऱ्यावर कारवाई चालू केली आहे. मागील चार दिवसात एकुण २८८ केस झाल्या असुन ३५ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

Previous articleजनजागृती अभियान अंतर्गत सेनिटायजर मास्क व रोगप्रतिकार शक्तीच्या गोळ्यांचे पोलीस मित्र संघटनेच्या वतीने वाटप
Next articleराजे शिवछत्रपती मित्रमंडळाने विसर्जन स्थळी गर्दी होऊ नये म्हणून गणेश भक्तांच्या घरोघरी जाऊन केले मूर्तींचे संकलन