जनजागृती अभियान अंतर्गत सेनिटायजर मास्क व रोगप्रतिकार शक्तीच्या गोळ्यांचे पोलीस मित्र संघटनेच्या वतीने वाटप

Ad 1

अमोल भोसले,उरुळी कांचन -प्रतिनिधी

कोरोना महामारीच्या काळामध्ये प्रशासनाने वेळोवेळी केलेल्या सुचनांचे पालन नागरिक करताना दिसत नाहीत.लोक सेनिटायजर आणि मास्क याचाही वापर न करताना गर्दिने लोक फिरताना दिसत आहेत.अशा प्रसंगी जनजागृती अभियानाच्या माध्यमातुन महिला पोलीस मिञ संघ सदस्यांनी ड्रिम्स निवारा सोसायटी ते नायगाव पेठ रोडवरुन मास्क न वापरणारे १५० वाटसरु लोकांना सेनिटायजर व मास्क आणि रोगप्रतिकार शक्तीच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी पोलीस मिञ संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्रा.सुरेश वाळेकर, महिला पोलीस मिञ संघ शाखा ड्रिम्स निवारा उपाध्यक्षा आरती मुन ,प्रशांती साळवे, प्रियांका जाधव, मनिषा कुंभार, अर्चना वनपुरे, मोना ननवरे, कविता टोळे, सारिका जगताप, श्रीगुरुदत्त सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनिल तुपे, योगेश जाधव या महिला पोलीस मिञ संघातील सदस्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.