गुरव समाज सेवा संस्थेतर्फे जुन्नर तालुक्यातील १०१ कोरोना योध्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव

Ad 1

जुन्नर-गुरव समाज सेवा संस्था महाराष्ट्र रजि.या संस्थेतर्फे शिवजन्मभूमी शिवनेरी किल्ल्यावर वृक्षारोपण करण्यात आले व कोविड 19 काळात ज्या सामाजिक, राजकीय,प्रशासकीय क्षेत्रातील लोकांनी समाजासाठी स्वताचा जीव धोक्यात घालून काम केले अश्या महाराष्ट्रातील १०१ योध्यांचा सन्मान करून त्यांना संस्थेच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.

 


तहसीलदार जुन्नर हनुमंत कोळेकर,पोलीस निरीक्षक जुन्नर श्री.युवराज मोहिते,पोलीस उपनिरीक्षक सौ.स्मिता नवघरे,नगराध्यक्ष जुन्नर श्री.श्याम पांडे,नायब तहसीलदार जुन्नर श्री.सचिन मुंडे,वनविभाग अधिकारी जुन्नर श्री.अजित शिंदे,श्री.रमेश खरमाळे,श्री.कृष्णा दिघे,MSEB अधिकारी श्री.डी.पी. गायकवाड, आरोग्यधिकारी जुन्नर डॉ.उमेश गोडे,श्री.श्याम बनकर,डॉ.वर्षा गुंजाळ,डॉ.मंगल शेंडे,कॅनरा बँक आपटाळे शाखा प्रबंधक श्री.श्रीधर झा,आमदार जुन्नर श्री.अतुलशेठ बेनके,माजी आमदार श्री.शरददादा सोनवणे,चेअरमन विघन्हर साखर कारखाना श्री.सत्यशीलदादा शेरकर,जिल्हा परिषद सदस्य सौ.आशाताई बुचके,नगरसेवक जुन्नर श्री.भाऊ कुंभार,माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.भाऊसाहेब देवाडे,आदिवासी नेते श्री.मारुती वायाळ,नारायणगाव सरपंच श्री.बाबूभाऊ पाटे,सामाजिक कार्यकर्ते श्री.सचिन भोजणे, श्री.महेश शेळके यांचा संस्थेतर्फे सन्मान करण्यात आला

यावेळी राज्य अध्यक्ष श्री.सचिनभाऊ पवार,महिला अध्यक्ष सौ.स्मिता पांडे,पुणे जिल्हा अध्यक्ष,श्री.
गोरक्षभाऊ कौदरे, पुणे जिल्हा कार्यअध्यक्ष श्री.रावसाहेब शिंदे,पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्री. पृथ्वीराज गुरव,राज्य उपाध्यक्ष श्री.मिनींनाथ कौदरे यांच्या सह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते