कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर कर ;विघ्नहर्त्याकडे जयहिंद मित्र मंडळाचे साकडे

Ad 1

चाकण-महाळुंगे (ता.खेड) येथील गणेशोत्सवाची ४० वर्षांची परंपरा लाभलेले मंडळ म्हणून जय हिंद मंडळाची ओळख आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करून अधिकाधिक महाळुंगे येथील कोविड सेंटरला मदत करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.

यंदा सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असून कोणत्याही प्रकारची लोकवर्गणी मागण्यात येणार नसल्याचे मंडळाचे अध्यक्ष अतुल जावळे यांनी जाहीर केले. शासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत मंडळाने गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेक मोठ्या गणेश मंडळांनी देखील यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीत करण्याचा निर्णय घेतला आहे. तर जय हिंद मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विघ्नहर्त्याकडे कोरोना हे संकट लवकरात-लवकरत दूर होऊ दे अशी प्रार्थना करत साकडे घातले.