सातकरस्थळ ग्रामपंचायतीच्या वतीने महिलांना परसबागेचे प्रशिक्षण व बियाणे वाटप

राजगुरुनगर– पंचायत समिती खेड आणि पर्याय प्रतिष्ठान तसेच ग्रामपंचायत सातकरस्थळ यांच्या संयुक्त विद्यमाने सातकर स्थळ पश्चिम आणि सातकरस्थळ पूर्व येथे परसबाग बियाणे वाटप व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

सदर उपक्रमासाठी आर्थिक सहकार्य पुणे जिल्हा मनसे जिल्हाध्यक्ष समीरभाऊ थिगळे तसेच त्यांच्या मातोश्री विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सातकरस्थळ सौ अलकाताई थिगळे यांनी दिले.परसबाग महत्व ,उपयुक्‍तता, परसबाग निगा ,परसबाग लागवड, परसबाग किड व्यवस्थापन इत्यादी विषयांवर संस्थेच्या वतीने मार्गदर्शन केले.

याप्रसंगी लोकनियुक्त सरपंच सातकरस्थळ सौ संजीवनीताई थिगळे, विद्यमान उपसरपंच सौ सांडभोर ताई ,ग्रामपंचायत सदस्य सौ मारणेताई, ग्रामपंचायत सदस्य सौ लांडेताई ,ग्रामपंचायत सदस्य व कार्यक्रमाला यांनी आर्थिक सहकार्य केले.

यावेळी सौ अलकाताई थिगळे, पंचायत समिती विस्तार अधिकारी श्री साळुंखे साहेब ,पंचायत समिती एम एस आर एल एम समन्वयक आम्रपाली पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते दोन्ही ठिकाणी परसबाग सेंद्रिय बियाणे वाटप करण्यात आले.

सरपंच सौ संजीवनीताई थिगळे यांनी महिलांना मार्गदर्शन करून भविष्यामध्ये उत्कृष्ट परसबागेसाठी बक्षीस देण्याचे जाहीर केले.

सौ स्वातीताई थिगळे व सौ अलकाताई थिगळे यांनी सातकर स्थळ पश्चिम व सातकर स्थळ पूर्व हे दोन्ही ठिकाणी अतिशय सुंदर आयोजन केले, सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी मेहनत घेतली व कार्यक्रम यशस्वी केला.

Previous articleदावडी येथे “सुरक्षित गणेशोत्सव” मोहीम
Next articleकोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर कर ;विघ्नहर्त्याकडे जयहिंद मित्र मंडळाचे साकडे