नारायणगाव चे सरपंच योगेश पाटे कोरोना बाधीत

नारायणगाव (किरण वाजगे)

नारायणगाव येथील सरपंच योगेश पाटे हे आज कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.

जुन्नर तालुक्यात आज ३४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून आजपर्यंत आढळलेल्या एकूण ११५८ रुग्णांपैकी ६८० रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत.

वडज येथे ११ तर नारायणगाव येथे आज ५ कोरोणा पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून ओतूर येथे तीन, शिरोली बुद्रुक, येणेरे, निमगाव सावा व जुन्नर शहर येथे प्रत्येकी दोन, तसेच रोहोकडी, हिवरे तर्फे नारायणगाव, भोरवाडी, उंब्रज नंबर १, अमरापूर, निमगाव तर्फे महाळुंगे येथे प्रत्येकी एक कोरोणा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे.
आज कोरोनामुळे शिरोली बुद्रुक येथील एक ५४ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ वर्षा गुंजाळ यांनी दिली.

दिवसेंदिवस वाढत्या कोरोणा रुग्णांमुळे जुन्नर तालुक्यांमध्ये निश्चितपणे चिंतेचे वातावरण पसरले आहे. कोरोना संसर्ग वाढीच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंग चे पालन करणे गरजेचे असून योग्य कारणासाठीच घराबाहेर पडावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे गेल्या चार दिवसात सुमारे २३५ पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण जुन्नर तालुक्यात निष्पन्न झाल्यामुळे व एक हजार शंभर पेक्षा जास्त रुग्ण आढळून आल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्यात आज पर्यंत ११५८ पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झाली आहे. यातील सुमारे ६८० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर ४३२ अँक्टीव रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत एकूण ४६ रुग्णांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ उमेश गोडे व वैद्यकीय अधिकारी डॉ वर्षा गुंजाळ यांनी दिली.

Previous articleऑरगॅनिक फार्म मध्ये अज्ञात चोरट्यांनी केली चोरी
Next articleदावडी येथे “सुरक्षित गणेशोत्सव” मोहीम