ऑरगॅनिक फार्म मध्ये अज्ञात चोरट्यांनी केली चोरी

अमोल भोसले,उरुळी कांचन – प्रतिनिधी

आमदार अनिल शिवाजीराव भोसले यांचे ऑरगॅनिक फार्म मधील बंगल्याच्या कुलुपाचा कोयंडा कशानेतरी तोडुन आत प्रवेश करून कोणीतरी अज्ञात चोरटयांनी ७४ हजार ५०० रुपये किमतीचे २ एलसीडी टिव्ही, होम थिएटर, दुध पकिंग करण्याची मशीन, लस्सी बनविण्याची मशीन घरफोडी चोरी करून चोरून नेले असल्याची घटना कोरेगावमुळ ( ता. हवेली ) येथे घडली आहे.

याप्रकरणी शिवाई ऑरगॅनिक फार्मचे सुपरवायझर महादेव जनार्दन खंडागळे ( वय ४८, सध्या रा. कोरेगांवमुळ, शिवाई ऑरगॅनिक फार्म ता. हवेली. मूळ रा. गाव उपळवटे ता. माढा जि. सोलापुर ) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्यांविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहेे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरगांवमुळ गावचे हद्दीतील आमदार अनिल भोसले यांचा शिवाई ऑरगॅनिक फार्म आहे. या ठिकाणी असलेल्या बंगल्यात तुप, लोणी, पनीर, लस्सी, खवा असे दुधापासुन पदार्थ बनविण्याचे काम चालू आहे.

३० ऑगस्ट रोजी गणपतीची आरती करून रात्री ९ – ३० वाजण्याच्या सुमारास बंगल्यास व गेटला कुलूप लावून खंडागळे घरी गेले. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे फार्मवर आले. गेटचे कुलूप उघडून आत गेले. गोठ्यामधील गायींच्या धारा काढुन झालेनंतर सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास कामगारांसमवेत ते बंगल्यासमोर बसवलेल्या गणपतीची आरती करण्यासाठी गेले तेव्हा त्यांना तेथे होम थिएटरची मशीन दिसली नाही. त्यानंतर ते बंगल्यासमोर गेले असता त्यांना बंगल्याचे मुख्य दरवाजाचा कोयंडा तुटलेला दिसला. त्यामुळे त्यांनी आत जावुन पाहीले असता, हॉलमध्ये आतील दुसरे खोलीचे कुलुप तोडलेले व खाली पडलेले होते. व दरवाजा बंद केलेला होता. तर तिस-या खोलीत जावुन पाहीले असता, त्या खोलीतील मोठा भिंतीला लावलेला एलसीडी टिव्ही तसेच मालकाचे बेडरूममधील छोटा एलसीडी टिव्ही. दिसला नाही. तर किचन रूममध्ये ठेवलेली दुध पॅकिंग मशीन व वरचे बेडरूममधील कपाटातील लस्सी बनविण्याचे मशीन दिसले नाही. सदर बाब पोलीसांना फोनवरुन कळवले नंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले व पाहणी केली.

त्यानंतर महादेव खंडागळे यांनी ऊरुळी कांचन दूरक्षेत्रात जावून ४५ हजार रुपये किमतीचा एक ७२ इंची सोनी कंपनीची एलसीडी टिव्ही, १६ हजार रुपये किमतीचा एक ४२ इंची सोनी कंपनीची एलसीडी टिव्ही, १ हजार ५०० रुपये किमतीचा सोनी कंपनीचा होम थिएटर, २ हजार रुपये किमतीचे दुध पकिंग करण्याची मशीन, व १० हजार रुपये किमतीचे एक लस्सी बनावण्याची मशीन अश्या एकूण ७४ हजार ५०० रुपये किमतीच्या वस्तू अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद दिली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन चौधरी हे करत आहेत.

Previous articleतोंडाला मास्क न वापरणाऱ्या वर लोणिकंद पोलिसांचा दंडात्मक कारवाईचा दणका
Next articleनारायणगाव चे सरपंच योगेश पाटे कोरोना बाधीत