तोंडाला मास्क न वापरणाऱ्या वर लोणिकंद पोलिसांचा दंडात्मक कारवाईचा दणका

शिक्रापुर / प्रतिनिधी

वाघोली (ता:हवेली) मध्ये कोरोनाचा वाढता प्रार्दूभाव पाहता वाघोली ग्रामपंचायत , प्राथमिक आरोग्य केंद्र,लोणीकंद पोलिस,तसेच प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. लोणिकंद पोलिस स्टेशन हद्दीतील गावासह वाघोलीमध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालता फिरणाऱ्या,तसेच रस्त्यावर थुंकणाऱ्या,विनाकारण फिरून सोशल डिस्टंसिंग चा भंग करणाऱ्या नागरिकांवर लोणीकंद पोलिसांच्या वतीने दंडात्मक कारवाईची जोरदार मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे.यामध्ये गेल्या दोन दिवसात जवळपास शंभर ते दीडशे नागरिकांवर दोनशे ते पाचशे रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली ही कारवाई अजून काही दिवस सुरूच राहणार आहे.

यामुळेनागरिकांनी लोणीकंद पोलिसांचा चांगलाच धसका घेतलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी मार्केट,बाजारात, भाजीपाला, किराणा दुकान ,इतर सार्वजनिक ठिकाणी वावरताना,वाहनाने प्रवास करताना मास्क वापर करावा अन्यथा पोलिसांच्या दंडात्मक कारवाई कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.या

कारवाईमध्ये चार दिवसात एकूण पाचशे ते सहाशे लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून यामध्ये एक लाख 36 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.ही कारवाई लोणीकंद चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलिसांची टीम तयार करून मास्क न वापरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

Previous articleप्रा.शिवाजी गायकवाड यांना पीएचडी प्राप्त
Next articleऑरगॅनिक फार्म मध्ये अज्ञात चोरट्यांनी केली चोरी