प्रा.शिवाजी गायकवाड यांना पीएचडी प्राप्त

अमोल भोसले,उरुळी कांचन – प्रतिनिधी

समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयाचे माजी विभागप्रमुख डॉ. शिवाजीराव संभाजी गायकवाड यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापठा कडून मराठी या विषयातील विद्यावाचस्पती पीएचडी प्राप्त झाली आहे.

त्यांच्या प्रबांधाचा विषय- गौतम बुद्धांची मराठीतील चरित्रे – एक अभ्यास असा होता. बी. डी. काळे घोडेगाव महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख डॉ. ज्ञानेश्वर अंबादास वाल्हेकर हे मार्गदर्शक होते. या वेळी पीएच. डी. ची मौखिक परीक्षा ऑनलाईन घेण्यात आली .

या मैखिक परीक्षेसाठी जळगाव वरुन बहिस्त – परीक्षक डॉ. वासुदेव वले होते. तर अध्यक्ष म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. प्रभाकर देसाई उपस्थित राहून ऑनलाईन मौखिक परीक्षेचे आयोजन केले होते. सादर मौखिक परीक्षेसाठी महाराष्ट्रातील जवळ जवळ ३९ प्रा. उपस्थित होते. यावेळी प्रबंध विषयावर साधक बाधक चर्चा झाली सर्व प्रश्नांची डॉ. शिवाजी गायकवाड यांनी समाधानकारक उत्तरे दिली. त्यांच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून डॉ. शिवाजी गायकवाड यांचे अभिनंदन होत आहे. विशेष करुन उस्मानाबाद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख , संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी अभिनंदन केले.

Previous articleनाटाची फेरपरीक्षा व्हावी गौतम कांबळे यांनी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे केली मागणी
Next articleतोंडाला मास्क न वापरणाऱ्या वर लोणिकंद पोलिसांचा दंडात्मक कारवाईचा दणका