नाटाची फेरपरीक्षा व्हावी गौतम कांबळे यांनी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे केली मागणी

Ad 1

दिनेश पवार,दौंड प्रतिनिधी:-

नाटाची फेरपरीक्षा घेण्याची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे गौतम कांबळे राज्य महासचिव कास्ट्राईब संघटना यांनी केली आहे.नाटा परीक्षेबाबत माहिती देताना शगौतम कांबळे राज्य महासचिव कास्ट्राईब संघटना म्हणाले की दिनांक 29 ऑगस्ट 2020 रोजी घेण्यात आलेली नाटाची (NATA ) फेरपरीक्षा घेण्यात यावी अशी मागणी रामदास आठवले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री यांच्याशी संपर्क साधून केली आहे .

याबाबत माहिती देताना गौतम कांबळे म्हणाले की नाटाची दि 29 /8 /2020 रोजी परीक्षा घेण्यात आली .ही परीक्षा ऑनलाईन घेण्यात आली असून परीक्षेसाठी संगणकावर प्रश्नपत्रिका उपलब्ध होऊ शकली नाही .परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना मदत करणारे ट्रेनर उपस्थित नव्हते .त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले नाही.

संगणकावर प्रश्नपत्रिका वेळेत उपलब्ध होऊ शकली नाही त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही .हा प्रकार गंभीर असून यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार आहे. त्यामुळे नाटाची फेरपरीक्षा घेण्यात यावी अशी मागणी गौतम कांबळे राज्य महासचिव महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ प्रणित शिक्षक आघाडी यांनी रामदास आठवले केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री यांच्याकडे केली आहे .