शिरोली मधील अंबिका तरुण मंडळाचा गणेशोत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचा स्तुत्य उपक्रम

Ad 1

राजगुरुनगर :शिरोली येथील वाडेकर स्थळ येथील अंबिका तरुण मंडळाने यंदा गणपती उत्सवानिमित्त इतर कुठलेही कार्यक्रम न घेता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यात रक्ताचा तुटवडा असल्याने रक्तदान शिबीर घेऊन एक समाजउपयोगी कार्यक्रम घेतला.या रक्तदान शिबिरात जवळपास 60 बाटल्यांचे संकलन करण्यात आले.

 

1

रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना प्रत्येकी एक झाड मंडळाच्या वतीने देण्यात आले.
शिबिरासाठी चाकण ब्लड बँकेचे डॉ रवी सर डॉ नितीन दौंडकर डॉ प्रतीक्षा खरात डॉ महेश लोखंडे डॉ अभिजित कांबळे डॉ विनायक गवळी डॉ राजेंद्र कारले यांचे सहकार्य लाभले.

उपक्रम यशस्वी करण्यासाठी अंबिका तरुण मंडळाचे अध्यक्ष श्री अविनाश सोपान शिंदे उपाध्यक्ष मा योगेश दगडू वाडेकर खजिनदार मा योगेश देवराम वाडेकर मा आदेश वसंत वाडेकर व सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले..