श्री.क्षेत्र महाळुंगे येथील सहयोग मित्र मंडळाचा रक्तदानाचा अभिनव उपक्रम

चाकण -देशभरात कोरोना व्हायरसने घातलेल्या थैमानामुळे जवळपास 3 महिन्यांपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले होते. या लॉकडाऊनच्या काळात अनेक रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुडवटा निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रत्येकाने शक्य असल्यास रक्तदान करावे असे आवाहन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काही दिवसांपुर्वी केले होते. हीच बाब लक्षात घेता खेड तालुक्यातील श्री क्षेत्र महाळुंगे येथील सहयोग मित्र मंडळातील तरुणांनी रक्तदानाचा अभिनव उपक्रम केला आहे.

अवघे जग कोरोना या आजाराशी लढत असतां, भारतासह महाराष्ट्रात रक्ताचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाला हरवण्यासाठी ग्रामीण भागातील तरुण सरसावले आहेत. दरवर्षी सहयोग मित्र मंडळ यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते.

पण यावर्षी रक्ताचा पुरवठा कमी पडल्याने श्रीक्षेत्र महाळुंगे येथील सहयोग मित्र मंडळ व चाकण रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील तरुणांना फोन करून रक्तदानाची विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देत तरुणांनी शिबिराचे आयोजन केले होते. तोरणाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून रक्तदान शिबिराचे उत्स्फूर्तपणे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिली

Previous articleमानवाधिकार सुरक्षा संघ पुणे जिल्हा कार्याध्यक्ष पदी सुभाष कदम
Next articleशिरोली मधील अंबिका तरुण मंडळाचा गणेशोत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचा स्तुत्य उपक्रम