मानवाधिकार सुरक्षा संघामुळे पुण्यातील वृद्धेवरती झाले वेळीच उपचार

दिनेश पवार दौंड प्रतिनिधी-

मानवाधिकार सुरक्षा संघ सर्वसामान्य व्यक्तींच्या अडचणींना सोडवण्यासाठी सदैव तप्तर असल्याची प्रचिती काल पुणे येथे आली,पुण्यातील एक वयोवृद्ध आजी ची ट्रिटमेंट गेली एक महिन्यापासून सुरू असणाऱ्या हॉस्पिटलने जागा उपलब्ध नसल्याचे कारणाने नाकारली,त्यानंतर नातेवाईकांनी इतर ही हॉस्पिटलमध्ये चौकशी केली इतरही अशीच उत्तरे मिळाल्याने नातेवाईकांनी  मानवाधिकार सुरक्षा संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष-अफसर शेख,पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष-उमेश शिंदे ,जिल्हाध्यक्ष-नितीन मोरे यांना संपर्क साधला असता सदर पदाधिकारी यांनी याची दखल घेऊन या वृद्ध महिलेस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास प्रशासनास भाग पाडले,तर दुसरीकडे मानवाधिकार सुरक्षा संघाचे कोकण विभाग चे निरीक्षक सदाशिव रणदिवे यांनी कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमध्ये एक कंपनीने कामगारांचे पगार  अडवलेले होते ते देण्यास भाग पाडले या घटनेमुळे सर्वसामान्य जनतेने या सर्व पदाधिकारी यांचे आभार मानले

Previous articleवाघोली ग्रामपंचायतच्या वतीने अंबुलन्स लोकार्पण व वृक्षारोपण
Next articleमानवाधिकार सुरक्षा संघ पुणे जिल्हा कार्याध्यक्ष पदी सुभाष कदम