वाघोली ग्रामपंचायतच्या वतीने अंबुलन्स लोकार्पण व वृक्षारोपण

Ad 1

शिक्रापुर/ प्रतिनिधी

वाघोली (ता.हवेली) येथे शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वाघोली ग्रामपंचायतच्या वतीने एका अॕब्युलसचे लोकार्पण करत वृक्षारोपण करण्यात आले. अशोक पवार यांनी वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून लोकहिताची कामे व वृक्षरोपण करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते याआव्हानाला प्रतिसाद देत वाघोली मध्ये कार्यकर्त्यांच्या वतीने पुणे-नगर महामार्गावर असलेल्या रस्ता दुभाजकाच्या मधोमध सुमारे एक किलोमीटर पर्यंत वृक्ष व फुलझाडांची लागवड करण्यात आली.तर वाघोली ग्रामपंचायतच्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून वाघोलीतील नागरिकांच्या सेवेसाठी एका ॲम्बुलन्सचे लोकार्पण देखील करण्यात आले.

यावेळी वाघोलीच्या  सरपंच वसुंधरा उबाळे, उपसरपंच मालती गोगावले,माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील, माजी उपसरपंच शिवदास उबाळे, बाळासाहेब सातव, पंडित दरेकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी ,कार्यकर्ते व गावातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

 आमदार अशोक पवार यांचे वाघोली वर विशेष लक्ष असून त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकास कामे सुरु आहे. त्यांनी वाढदिवसनिमित्ताने केलेल्या  आवाहनाला प्रतिसाद देत  वाघोली ग्रामपंचायतच्या वतीने वृक्षलागवड करत एका ॲम्बुलन्स चे लोकार्पण करण्यात आले .

वसुंधरा उबाळे (सरपंच,वाघोली)

शिरूर-हवेली मतदारसंघात सध्या अशोक पवार यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे होत आहेत तर त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्याचे आव्हान कार्यकर्त्यांना केले होते त्यालादेखील मतदारसंघात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत शिरूर-हवेली मतदारसंघ मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली आहे

राजेंद्र सातव पाटील

(मा: उपसरपंच वाघोली)