दौंड ग्रामीण मध्ये आज कोरोना चे  24 रुग्ण

दिनेश पवार-दौंड(प्रतिनिधी)

दौंड ग्रामीण मध्ये कोरोना चे रुग्ण वाढतच चालले आहेत,आज दिनांक 30 ऑगस्ट  2020 रोजी दौंड ग्रामीण मध्ये एकूण 24 रुग्ण पॉजीटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक रासगे यांनी दिली,

दिनांक 29 ऑगस्ट 2020 रोजी एकूण 76 जणांचे नमुने तपासणीसाठी नेले असता त्यातील 24 रिपोर्ट पॉजीटिव्ह आले आहेत, हे रुग्ण कुरकुंभ-10,पाटस-11,आलेगावं-2,वडगाव दरेकर-1 येथील रुग्णांचा समावेश आहे,यामध्ये 16 पुरुष व 8 महिलांचा समावेश आहे, हे सर्व रिपोर्ट स्वामी चिंचोली येथिल आहेत. कोरोना साखळी तोडायची असेल तर नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे, घाबरून न जाता आवश्यक ती खबरदारी घेतल्यास हे संकट नक्कीच दूर होईल, सर्वांनी मास्क वापरावे,सॅनिटायजर चा वापर करून सोशल डिस्टन्स पाळणे गरजेचे आहे.

Previous articleमाहिती अधिकार कार्यकर्ते वारघडे यांना बंदूकधारी अंगरक्षक
Next articleवाघोली ग्रामपंचायतच्या वतीने अंबुलन्स लोकार्पण व वृक्षारोपण