कुख्यात आरोपीच्या दौंड पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Ad 1
दिनेश पवार-दौंड(प्रतिनिधी)

सोलापूर जिल्ह्यातील कुख्यात आरोपी विनायक उर्फ बटल्या गौतम सिंधे (वय – 24 ,सलगर वस्ती,सोलापूर शहर ) यााल दौंड पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले, बटल्या ने सोलापूर येथे जबरी चोरी करून वैजापूर येथून  पोबारा केला होता, बरेच दिवस सोलापूर पोलीस त्याच्या मागावरती होते,परंतु प्रत्येक वेळेस तो सोलापूर पोलिसांना गुंगारा देत होता.दि. 27 ऑगस्ट रोजी बटल्या दौंड येथे येणार असल्याची माहिती दौंड पोलिसांना समजली होती,

दौंड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार-असिफ शेख,पांडुरंग थोरात,पोलीस कॉन्स्टेबल-किरण राऊत,अमोल देवकाते,अमोल गवळी,रवींद्र काळे,यांनी दौंड मध्ये महाराजा हॉटेल जवळ सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्या व पुढील कारवाई साठी सोलापूर शहर पोलिसांच्या ताब्यात दिले,सदर कामगिरी मुळे दौंड पोलिसांच्या कर्तव्यदक्ष कामगिरीमुळे परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे तर वरिष्ठांनी देखील दौंड पोलीसांच्या कार्याचे कौतुक केले आहे

जाहिरात