साहित्यिक शरद गोरे यांची विधानपरिषदेसाठी चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोटयातून मिळणार संधी

Ad 1

उरुळी कांचन – प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून गोरे यांना संधी दिली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.येत्या काही दिवसांत राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांची निवड करण्यात येणार आहे.

यांपैकी साहित्यिक गोटातून विधान परिषदेच्या आमदारकी साठी शरद गोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून शरद गोरे यांच्या नावाला पसंती असल्याची खात्रीशीर माहिती आहे. शरद गोरे हे १९९३ पासून अखिल भारतीय साहित्य परिषदेचे संस्थापक कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यकाळात जवळपास ९४ विदर्भ, मराठवाडा, कोकण,उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक आदि ठिकाणी साहित्य संमेलने घेण्यात आली आहेत.ग्रामीण भागातील साहित्यिकांना एक विचारपीठ उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने शरद गोरे हे अविरत कार्य करीत आहेत. गोरे यांनी त्यांच्या युगंधर या प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत जवळपास १२० पुस्तके प्रकाशित केली आहेत. छत्रपती संभाजी महाराज यांनी संस्कृत भाषेत लिहिलेला बुधभूषण हा अत्यंत दुर्मिळ व महत्वपूर्ण ग्रंथ गोरे यांनी मराठी भाषेत काव्य स्वरूपात अनुवादित केला आहे. त्याच बरोबर शेतकरी आत्महत्या की हत्या या चिंतनशील ग्रंथाबरोबर एकूण 9 पुस्तकांचे लेखन केले आहे.

आपल्या प्रभावी वकृत्तवासाठी ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत आजवर त्यांनीे शेकडो व्याख्याने दिली आहेत,छञपती शिवाजी महाराज, छञपती संभाजी महाराज, महात्मा फुले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर या सह विविध विषयांवर व्याख्याने झाली आहेत,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मध्ये बहिःशाल शिक्षण मंडळात ते अनेक वर्षांपासून ते व्याख्याता म्हणून कार्यरत आहेत.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पहिले प्रवक्ते म्हणून ते काम पाहत आहेत,
त्यांनी रणागंण, प्रेमरंग या चित्रपटासह एकूण 5 चित्रपटांसाठी संगीत दिले आहे व गीत लेखन हि केले आहे व चित्रपटाचे दिग्दर्शन हि केले आहे, प्रेमरंग, फाटक, ऐतवी, या चित्रपटाचे निर्माते हि आहेत, नाटय ,चित्रपट, संगीत, या क्षेत्रात त्यांच्या नावाचा ठळकपणे उल्लेख केला जातो. प्रेमकवी म्हणून ते राज्यभरात प्रसिद्ध आहेत आशा बहुआयामी साहित्यिकाची विधानपरिषदेवर वर्णी लागू शकते. शरद गोरे यांचे नाव विधानपरिषद सदस्य पदासाठी अचानक पुढे आल्याने राजकीय क्षेत्रात देखील चर्चेला उधाण आले आहे.