खेड तालुका रेशनिंग दुकानदार संघाच्या उपाध्यक्षपदी बाबासाहेब  गोरडे यांची बिनविरोध निवड

Ad 1

राजगुरुनगर-आदर्श गाव गोसासी नगरीचे सुपुत्र,लाभार्थ्यांना रेशनिंगची पारदर्शक सेवा देणारे निरपेक्ष व्यक्तिमत्व असणार्‍या बाबासाहेबांची निवड झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. ज्या गोसासी गावाचा सन्मान दिवंगत राष्ट्रपती डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या हस्ते झाला होता अशा संत गाडगेबाबा ग्रामअभियानाची गोसासी गावामध्ये प्रभावी अंमलबजावणी, शासनमान्य प्रा.नानासाहेब गोरडे सार्वजनिक वाचनालयाच्या उभारणीमध्ये महत्वपुर्ण योगदान,विविध कार्यकारी सोसायटी, ग्रामपंचायतीमधील अभ्यासपुर्ण योगदान, समयसूचक वक्तृत्व आदींमुळे बाबासाहेब गोरडेंचे नाव पुर्व भागात वलयांकित आहे.

यावेळी  खेड तालुका रेशनिंग दुकानदार संघाचे अध्यक्ष अरुण हलगे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश खळदकर, संदीप शेटे, संजय गायकवाड , तुषार पवार,  वंदनाताई सातपुते, मंगल रमेश राळे, मनिषा कुबडे, बाळासाहेब गायकवाड, सुनील मावळे आदि प्रतिनिधी उपस्थित होते.

  आमदार दिलिप मोहितेपाटील,जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मलाताई पानसरे, गोसासी ग्रामस्थ, सगेसोयरे आदींनी गोरडे यांचे अभिनंदन केले.

जाहिरात