दौंड शहर व ग्रामीण भागात कोरोना रुग्णांचा आकडा वाढताच…

दिनेश पवार-दौंड(प्रतिनिधी)

दौंड शहर व ग्रामीण भागात (दि .28 ) 2020 रोजी कोरोना चे एकूण 10 रुग्ण पॉजीटिव्ह आल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक -डॉ. संग्राम डांगे यांनी दिली.

रॅपिड अँटीजेन द्वारे तपासणी करून अर्ध्या तासात कोरोना चे रिपोर्ट प्राप्त झाले आहेत,उपजिल्हा रुग्णालय दौंड तर्फे एकूण 59 जणांची तपासणी रॅपिड अँटीजेन द्वारे करण्यात आली, यामध्ये 10 व्यक्ती चे रिपोर्ट पॉजीटिव्ह तर 49 रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत,यामध्ये 3 महिला तर 7 पुरुष यांचा समावेश आहे, हे सर्व रुग्ण pts नानविज=4,srpf-गट 7 मध्ये= 1,srpf-5 मध्ये= 1,पाटस-1,लिंगाळी-1,दौंड शहर-2 येथील रुग्णांचा समावेश आहे, हे सर्व रुग्ण 26 ते 48 वयोगटातील आहेत.

दरम्यान तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक रासगे यांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रामीण भागात आज 9 रुग्ण पॉजीटिव्ह आल्याची माहिती दिली एकूण 43 व्यक्ती चे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते यातील 9 व्यक्तींचे रिपोर्ट पॉजीटिव्ह आले आहेत यामध्ये पाटस – 7,आलेगाव – 1, बेटवाडी- 1,येथील रुग्णांचा समावेश आहे, हे सर्व रुग्ण 7 ते 67 वयोगटातील आहेत.
तालुक्यातील कोरोना ची साखळी तोडायची असेल तर नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे, मास्क, सॅनिटायजर, वापरणे गरजेचे आहे, सुरक्षित अंतर ठेवून वावरणे,विनाकारण कुठेही न फिरणे या गोष्टी पाळल्या तर नक्कीच ही कोरोना साखळी आटोक्यात येईल.

Previous articleदौंड तालुक्यातील रस्ते विकासाबाबत आमदार राहुल कुल यांचे केंद्रीय मंत्री-नितीन गडकरी यांना निवेदन
Next articleखेड तालुका रेशनिंग दुकानदार संघाच्या उपाध्यक्षपदी बाबासाहेब  गोरडे यांची बिनविरोध निवड