शिरूर तालुक्यातील एका सरपंचावर फसवणुक व ॲट्रॉसिटीचा गुन्हा;राजकीय वर्तुळात खळबळ

शिरूर तालुक्यातील पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेल्या टाकळी भीमा ता. शिरूर या गावचा सरपंच तसेच भारतीय जनता पार्टीचे सरपंच आघाडीचे शिरूर तालुका अध्यक्ष रवींद्र दोरगे व त्याच्या पत्नी आणि वडिलांवर जमिनीच्या व्यवहारात फसवणूक करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फसवणुक व ॲट्रॉसिटीचा गुन्हा करण्यात आला आहे. रवींद्र दोरगे याचेवर यापूर्वी देखील फसवणूक व आदी प्रकारचे गुन्हे दाखल असून अनेक बँकांचे कर्ज देखील थकविल्याबाबत नोटीस प्रसिद्ध झालेल्या आहेत.
यापूर्वीच्या अनेक गुन्ह्यांमध्ये सरपंच रवींद्र दोरगे हा फरार होता मात्र वारंवार गुन्हे दाखल होऊन देखील शिक्रापूर पोलिसांना दोरगे याला अटक करण्यात यश आलेले नव्हते तर आता तरी शिक्रापूर पोलीस रवींद्र दोरगे याला अटक करणार का याकडे तालुक्याचे लक्ष लागलेले आहे. तर शिरूर तालुक्यातील सरपंचावर फसवणुक व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

तर साध्या शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये टाकळी भीमा चा सरपंच रवींद्र दोरगे यांनी तळेगाव ढमढेरे येथील दीपक आल्हाट  व्यक्तीची जमीन विकत घेऊन जमीन खरेदी करताना दिलेले चेक बाउन्स झाले, त्यानंतर जमिनीच्या मूळ मालकांनी वारंवार पैशाची मागणी केली असतात त्याला पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर सरपंच रवींद्र दोरगे यांने चक्क ती जमीन दुसऱ्याला विकून टाकली, मात्र जमिनीचे मूळ मालक टाकळी भिमा येथे जाऊन रवींद्र चोरगे यांच्याकडे पैशाची मागणी केली असता रवींद्र जोगी यांनी त्यांना जातिवाचक शिवीगाळ करून निघून गेला यावेळी रवींद्र चोरगे यांचे वडील बाळासाहेब दोरगे व रवींद्र दोरगे यांची पत्नी यांनी देखील जमिनीच्या मूळ मालकाला जातीवाचक शिवीगाळ केली. त्याबाबत जमिनीचे मूळ मालक दीपक आल्हाट यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी सरपंच रवींद्र दोरगे याच्या सह त्याच्या पत्नी वडिलान विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

Previous articleमहाळुंगे पडवळ चे माजी सरपंच मधूकरशेठ दहितुले यांचे निधन
Next articleसरपंचावर फसवणूकीसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल शिरुर तालुक्यात खळबळ