कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन

Ad 1

अमोल भोसले – उरुळी कांचन,प्रतिनिधी

महाराष्ट्र साहित्य परिषद – उरुळी कांचन (ता.हवेली) शाखेने विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन केले होते. लहान गटासाठी “निसर्ग आपला मित्र” आणि मोठा गटासाठी गडकिल्ले संवर्धन असे सामाजिक बांधिलकी जपणारे विषय या निबंध स्पर्धेत घेण्यात आले होते. विशेष बाब म्हणजे पालक आणि शिक्षक या वर्गासाठी देखील खुला गटाचा समावेश होता यांना कोरोना काळात सुरु असलेला “ऑनलाईन शिक्षण पद्धती” हा विषय देण्यात आला होता. सर्व गटात मिळून १०० हुन अधिक सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले. निबंध स्पर्धेचे परीक्षण परिषदेचे अध्यक्ष लक्ष्मण घुगे आणि श्रीमती शशिकला पवार यांनी केले.
लहान गटात तन्वी बोधे, वेदांत शेवते, समीक्षा वाघमारे, कल्याणी शिंदे तसेच मोठ्या गटात साक्षी कदम, अनुष्का खेडेकर, दिशा गुप्ता,श्रावणी टिळेकर आणि खुल्या गटात अड. सुजित जाधवर, दिपाली जगताप, जया उभे, रोहित शिंगाडे, प्रणाली वनारसे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय,तृतीय आणि उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला.
सर्व विजेते आणि सहभागी स्पर्धकांचे परिषदेचे कोषाध्यक्ष अनिरुद्ध पवार आणि प्रमुख कार्यवाह संदीप कांचन यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी व विजेत्याना प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.