आमदार अशोक पवार पुन्हा मैदानात

Ad 1

उरुळी कांचन – प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपूर्वी एका कोरोना पाॅझिटीव्ह प्रशासकीय अधिकार्‍याच्या संपर्कात आल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आमदार अशोक पवार हे होम काॅरंटाईन झाले होते. कोरोनाची तपासणी केल्यानंतर त्यांचा अहवाल निगेटीव्ह आला. आणि सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला.

एक धडाकेबाज, आमदार म्हणून शिरुर – हवेलीची जनता त्यांच्याकडे आदरानं पहात आहे.जनसेवेसाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतलं आहे. पण कोरोना सारखा महाभयंकर संसर्गजन्य रोग आल्यामुळे काही बंधनं पाळावी लागत आहेत. तरीपण सर्व नियम पाळून ते जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांच्यामध्ये वावरत होते. पण एका प्रशासकीय अधिकार्‍याच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना होम काॅरंटाईन व्हावं लागलं. आता ते पुन्हा जनसामान्यांसाठी मैदानात उतरले आहेत. त्यामुळे काहीच काळजी करण्याचं कारण नाही. मतदारसंघातील असणाऱ्या समस्या समजून ते सोडवण्यासाठी सज्ज आहेत.