देऊळगाव राजे मध्ये मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई

Ad 1

दिनेश पवार-दौंड(प्रतिनिधी)

देऊळगाव राजे (ता.दौंड) येथे मास्क न वापरणाऱ्या वरती दौंड पोलीस स्टेशन व ग्रामपंचायत देऊळगाव राजे यांच्या वतीने कारवाई करण्यात आली.

कोरोना चा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी प्रशासन स्तरांवर वेगवेगळ्या उपाययोजना राबविल्या जात आहे,नागरिकांना वारंवार सूचना दिल्या जात आहेत की सोशल डिस्टन्स ठेवा,मास्क वापरा, गर्दी करू नका,गर्दी ची ठिकाणे टाळा,साबण किंवा सॅनिटायजर वापरून वारंवार हात स्वच्छ ठेवा,तरी देखील काही नागरिक बेपर्वा वागत आहेत,यांच्यावरती आज कारवाई करण्यात आली, या कारवाई मध्ये दौंड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक-ऋषिकेश अधिकारी,पोलीस कर्मचारी-रमेश काळे,नारायण वलेकर,ग्रामपंचायत देऊळगाव राजे च्या वतीने – संभाजी माने,सोमनाथ पोळ व गावचे पोलीस पाटील सचिन पोळ यांनी सहभाग घेतला.

दरम्यानदेऊळगाव राजे मधील कोरोना परिस्थिती आटोक्यात येण्यासाठी,जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती दौंड आणि ग्रामपंचायत देऊळगाव राजे यांच्या वतीने जनजागृतीपर फलक जनहितार्थ प्रसारित करून नागरिकांना काळजी घेण्याचे,सोशल डिस्टन्स ठेवण्याचे, मास्क वापरण्याचे, गर्दी न करण्याचे आवाहन केले जात आहे.तसेच गावचे पोलीस पाटील सचिन पोळ हे सतत सोशल मीडिया द्वारे गावातील नागरिकांना अफवा पसरवू नका,गर्दी करू नका,सहकार्य करा असे आवाहन करत आहेत, नागरिकही या सर्व उपक्रमास स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद देऊन सहकार्य करत आहेत.