अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या पुणे विभागीय सदस्यपदी ह.भ.प. दत्तात्रय सोळसकर यांची निवड

Ad 1

अमोल भोसले -उरुळी कांचन, प्रतिनिधी

दौंड तालुका वारकरी सांप्रदायाचे भूषण,कासुर्डी (ता.दौंड) येथील रहिवाशी ह.भ.प.दत्तात्रय महाराज सोळसकर यांची अखिल भारतीय वारकरी मंडळ पुणे विभागीय( पुणे,सातारा,सांगली,
कोल्हापूर,सोलापूर) सदस्यपदी निवड करण्यात आली.

सदर निवड राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले, केंद्रीय सदस्य शंकर महाराज शेवाळे, प्रदेशाध्यक्ष अनिल महाराज वाळके व पुणे विभाग अध्यक्ष आनंद महाराज तांबे यांनी केली.

गेली १५ वर्षा हून अधिक दौंड तालुका अध्यक्ष हि जबाबदारी चांगल्या पद्धतीने सांभाळत असताना पश्चिम महाराष्ट्रात नियुक्ती करण्यात आली. हभप दत्तात्रय महाराज सोळसकर हे २५ वर्षे पासून किर्तन, प्रवचन, व्याख्यान या माध्यमातून समाजप्रबोधन करीत आहेत.

तसेच १९९० पासून भुलेश्वर प्रासादिक दिंडी नंबर ४५ अखंड देहू ते पंढरपूर पायीवारी करीत आहेत. त्यांना श्रीकृष्ण सेवा राज्यस्तरीय पुरस्कारांसह विविध ४० हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.
अखिल भारतीय वारकरी मंडळच्या माध्यमातून पुणे विभागातील वारकरी बंधूचे प्रश्न सोडवणार असल्याचे यावेळी सोळसकर महाराज यांनी सांगितले.