भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या राज्य स्तरीय सदस्यपदी अमर बोऱ्हाडे यांची नियुक्ती

राजगुरुनगर-भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती मोर्चाची राज्य स्तरीय कार्यकारणी जाहीर झाली आहे.या मध्ये पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वाफगाव येथील भाजपचा कार्यकर्ता अमर बो-हाडे यांची भारतीय जनता पार्टीच्या अनुसुचीत जाती मोर्चा कार्यकारिणीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.निवडीचे पत्र पक्षाचे अनुसुचीत जाती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष सुधाकर भालेकर यांनी दिले आहे.भाजपमध्ये प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली आहे .

अमर बो-हाडे यांनी आज पर्यत अ.जा.मोर्चा जिल्हा सरचिटणीस ,दोन वर्षे पक्ष विस्तारक म्हणून काम केले आहे तसेच पंचायत समितीची निवडणुक लढवली आहे.

पक्षाने दिलेली जबाबदारी अनुसूचित जातीतील व इतर लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तसेच पक्ष वाढीसाठी व पक्षाचे विचार लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी महाराष्ट्र भर प्रवास करणार आहे .तसेच माझ्या सारख्या तरूण कार्यकर्त्यांला दिलेल्या संधीचे सोने करणार असल्याचे सांगितले. तसेच कोणत्याही राजकीय वारसा नसताना पक्षाने महाराष्ट्रत काम करण्याची संधी दिली आहे सामान्य कार्यकर्त्यांची पक्षाकडुन दखल घेतली जाते असे अमर बोऱ्हाडे यांनी सांगितले.

Previous articleरेटवडी,वाकळवाडी, वरुडे रस्त्याचे कनिष्ठ अभियंत्याकडून सर्वेक्षण
Next articleअखिल भारतीय वारकरी मंडळाच्या पुणे विभागीय सदस्यपदी ह.भ.प. दत्तात्रय सोळसकर यांची निवड