रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन उपसरपंच जयाताई दजगुडे यांच्या हस्ते संपन्न

शिरोली (ता.खेड) येथील ग्रामपंचायतीच्या 14 व्या वित्त आयोगाच्या निधीमधून वॉर्ड क्र तीन मध्ये तीन लाख रुपयांच्या अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन शिरोली गावच्या नवनिर्वाचित उपसरपंच सौ जयाताई दजगुडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी माजी सरपंच पै संजय सावंत,ग्रामपंचायत सदस्या सौ हिराताई वाळुंज, ग्रामपंचायत सदस्य दादा देवकर,मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मंगेशभाऊ सावंत, सोसायटीचे मा.चेअरमन जगन सावंत,नवशक्ती तरुण मंडळाचे अध्यक्ष संजय सावंत विजय सावंत, उद्योजक दत्ताभाऊ वाळुंज,राजेंद्र वाळुंज, भागवत वाळुंज, गणपत वाळुंज, माणिक मलघे, अमोल वाळुंज, नवनाथ मलघे,अंकुश वाळुंज, सतीश मलघे, चंद्रकांत वाळुंज, बाळासाहेब वाळुंज,संतोष खरपासे,योगेश बेंढाले, चिनुभाऊ शिंदे व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleवाळू माफियांचा दिवसा ढवळ्या नंगानाच
Next articleजुन्नर तालुक्यात तात्काळ १ हजार अँटीजेन किट्स उपलब्ध करून देणार – दिलीप वळसे पाटील