वाळू माफियांचा दिवसा ढवळ्या नंगानाच

शिक्रापुर /प्रतिनिधी

गेल्या काही दिवसापासून शिरुर तालुक्यातील महसुलचे एका मागून एक कारनामे समोर येत असताना पुन्हा एकदा शिरूर तालुक्यातील शिरसगाव काटा येथे वाळू माफियांचा दिवसा ढवळ्या धुमाकूळ सुरूच असून महसूल चे मात्र दुर्लक्ष असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.

शिरूर तालुक्यातील शिरसगाव काटा येथे घोड नदी पात्र मोठे आहे. त्याचबरोबर सध्या नदी ला काही प्रमाणात पाणीही सोडले असल्याने नदी पात्रात पाणी असताना ही वाळू वाहतुकीचे ट्रक थेट पात्रात भरले जात आहे.त्याचबरोबर काही वाळू ही ट्रॅक्टर च्या साहाय्याने उपसा करून स्मशानभूमी परिसरात वरती आणून साठा करून ठेवला जात आहे.साठा केलेला हा माल मोठ्या हायवा ट्रक च्या माध्यमातून वाहतूक केला जात आहे.हा सगळा प्रकार दिवसा ढवळ्या घडत असून याकडे महसूल चे दुर्लक्ष कसे असा सवाल ग्रामस्थांना पडला आहे.

याबाबतीत स्थानिक मंडलधिकारी प्रसन्न केदारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यानी सांगितले सकाळी आमच्या तलाठी भाउसाहेबांनी एक टॕक्टर आणि जेसीबी ताब्यात घेतले आहे.शिरुर पोलिसांना पोलिस बंदोबस्त मागितला आहे बंदोबस्त मिळताच पुन्हा कारवाई करण्यात येइल.

Previous articleदौंड पोलीस ठाणे अंतर्गत सर्व गावांमध्ये एक गाव एक गणपती उपक्रमास प्रतिसाद-पोलीस निरीक्षक-सुनील महाडिक
Next articleरस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन उपसरपंच जयाताई दजगुडे यांच्या हस्ते संपन्न