घोडेगाव पोलिस स्टेशनच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन

मोसीन काठेवाडी,घोडेगाव

रमजानच्या पवित्र महिन्याच्या निमित्ताने हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देण्यासाठी पुणे ग्रामिण पोलीस अधीक्षक अंकित गोयल( भा.पो.से)यांच्या संकल्पनेतील जनसंवाद अभियानांतर्गत, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घोडेगाव पोलिस स्टेशचे कर्तव्यदक्ष अधिकारी साहायक पोलिस निरीक्षक जीवन माने यांच्या वतीने रोजा सोडण्यासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन आज दि २१ एप्रिल २०२३ रोजी संध्याकाळी ६:३० वाजता सुन्नी मोमीन मस्जीद या ठिकाणी करण्यात आले होते.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक निखील मकदुम व पोलीस उपनिरीक्षक महेश पवार यांनी लहान मुलांना आपल्या हाताने घास भरवत रोजा सोडवण्यात आला व त्यांच्यासोबत बसून फलाहार केला.तसेच सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.


यावेळी मौलाना नदीम अज़हरी,मौलाना तसलीम अज़हरी,माजी ग्रामपंचायत सदस्य मस्जीत मुजावर,हाजी हमीद मिस्त्री,हाजी हसन पारवे,आसीफ तांबोळी,सलीम मोमीन,राजु मोमीन,इम्रान पठाण,जमीर मुंढे,राजु सय्यद,पापा मिया पठाण,हाजी उस्मान काठेवाडी,गोपनीय विभागाचे पोलिस अमलदार नामदेव ढेंगळे,बाळु सुरकुले,साहायक पोलिस उपनिरिक्षक बाळासाहेब पवार,पत्रकार मोसीन काठेवाडी,होमगार्ड स्वप्नील कानडे,तानाजी फलके,राहुल भवारी,दिनेश तिटकारे आदी मान्यवर सह मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव व युवक उपस्थित होते.


चंद्रदर्शन झाल्याने उदया दि.२२ रोजी सकाळी ८:३० वाजता घोडेगाव ईदगामैदानावर सामुहिक नमाज पठण करण्यात येईल असे यावेळी सांयकाळच्या नमाज नंतर मौलाना नदीम अज़हरी यांनी सांगितले.

Previous articleविठाबाई नारायणगावकर यांच्या तमाशाच्या व्यासपीठावर थेट बैलगाडा : समई नृत्य सादर करून संध्या माने यांनी मिळवली रसिकांची वाहवा
Next articleचोरी गेलेल्या स्विफ्ट व डिझायर कार चेन्नई येथून जप्त