Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिनेश पवार,दौंड(प्रतिनिधी)
दौंड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांनी एक गाव,एक गणपती या उपक्रमास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली. हा उपक्रम यशस्वी व्हावा यासाठी दौंड पोलिसांनी गावोगावी जावून घोंगडी बैठक घेऊन, गणेश मंडळाच्या पदाधिकारी व ग्रामस्थांशी चर्चा केली होती ,त्यास नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे पो.नि.सुनील महाडिक यांनी सांगितले.
सध्या गणेश उत्सव 2020 सुरू झालेला आहे या वर्षीचा गणेश उत्सव कोरोना संकटाचे सावट असलेला आहे. मार्च पासून लॉकडाऊन सुरू आहे. या काळामध्ये कोणत्याही प्रकारच्या जयंत्या सण-उत्सव साजरे करण्यात आलेले नाहीत. सर्व जनतेने पोलिसांच्या आवाहनास चांगला प्रतिसाद दिलेला आहे.

कायम गजबजलेलं व वाजत राहणार शहर म्हणून दौंड प्रसिद्ध आहे.परंतु गेले पाच सहा महिन्यापासून या शहरात कोणताही गाजावाजा नाही. दौंड शहरात सर्व जातीधर्माचे लोक राहत आहेत त्यामुळे कायदा सुव्यवस्थेसाठी हे शहर कायम संवेदनशील राहिलेले आहे त्यामध्ये कोरोना लॉकडाऊन राबवणे खूप अवघड होते व शहराचा बहुतांश भाग एस आर पी एफ रेल्वे ने व्यापलेला असल्याने लोकवस्ती वाढण्यास जागा नसल्याने लोक दाटीवाटीने राहत आहेत त्यामुळे महानगर सारखा दौंड शहरांमध्ये कोरोना वाढण्याचा धोका होता. त्यात दौंड हे रेल्वे जंक्शन असल्याने देशातील सर्व भागातून लोक येत असतात परंतु लोकांनी शासनाचे नियम व अटी पाळल्यामुळे कोरोना चा फैलाव दौंड मध्ये मोठ्या प्रमाणात झाला नाही. व कायदा सुव्यवस्था सुद्धा अबाधित राहिली.
यावर्षी दौंड शहरात सुद्धा सार्वजनिक गणपतीचे प्रमाण अतिशय कमी आहे कुठेही झगमगाट नाही दौंड पोलीस ठाण्या अखत्यारीत दौंड शहरा व्यतिरिक्त तीस गावे असून या सर्व गावांमध्ये एक गाव एक गणपती बसवण्यात आलेला आहे यासाठी दौंड पोलिस ठाण्याने प्रत्येक बीट प्रमाणे गावांमध्ये जाऊन बैठका घेण्यात आलेल्या आहेत त्याचे फलित म्हणून प्रत्येक गावांमध्ये एक गणपती बसलेला आहे व विसर्जन मिरवणूक न काढण्याचे सर्व गावकऱ्यांनी मान्य केले आहे. तसेच दरम्यानच्या काळामध्ये मोहरम सण असणार आहे या काळात सुद्धा कोणत्याही सवारी किंवा ताबूत निघणार नसल्याचे मुस्लिम समाजाने आश्वासन दिलेले आहे तरी या सणांच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी दौंड पोलीस ठाण्यास एस आर पी एफ सी दोन सेक्शन पस्तीस होमगार्ड मुख्यालय कडील दहा लोकं व पोलीस ठाणे कडील 75 लोक असा बंदोबस्त देण्यात आलेला आहे.
या काळात पोलिसांच्या साप्ताहिक सुट्या बंद करण्यात आलेले आहेत .या उत्सवाच्या काळात कोणी सोशल मीडियावर अफवा पसरवणे किंवा सामाजिक तणाव निर्माण होईल अशा पोस्ट टाकल्या तर त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येतील गुन्हेगारी प्रवृत्तीची पोस्ट फॉरवर्ड करणे हा सुद्धा गुन्हा आहे हे सर्व जनतेने लक्षात घेतले पाहिजे,तरी नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी असेच सहकार्य करावे असे आवाहन पो.नि.सुनील महाडिक यांनी यावेळी केले.
Download WordPress Themes Nulled and plugins.