भिमाशंकर इको सेन्सेटिव्ह झोनला आदिवासी बांधवांचा विरोध

Ad 1

राजगुरुनगर-आदिवासी विचार मंच व बिरसा ब्रिगेड खेड यांच्या वतीने आज खेडच्या तहसिलदार सुचित्रा आमले यांना निवेदन देवून भिमाशंकर इको सेन्सेटीव्ह झोनला विरोध दर्शविण्यात आला. खेड , आंबेगाव, जुन्नर, ठाणे, रायगड मधील अनेक गावांचा यामध्ये समावेश आहे.

खेड मधील खरपूड, भोमाळे, भिवेगाव सह अनेक गावांनी ग्रामसभेचा ठराव घेऊन विरोध दर्शवूनही स्थानिक जनतेशी चर्चा – विमर्श न करता घटनेतील अनुसूची ५ मधील पेसा कायद्यांतर्गत आदिवासी जनतेला दिलेला हवक डावलून केंद्र सरकार निर्णय घेत आहे. याला विरोध दर्शविण्यासाठी आज तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.

यामध्ये भीमाशंकर अभयारण्य परिसरात घोषित केलेल्या इको सेन्सिटिव्ह झोनची अधिसुचना रद करण्याची मागणी करण्यात आली . पुढील काळात मोठे जन आंदोलन उभारणार असल्याचे तालुका अध्यक्ष एकनाथ तळपे , विकास भाईक यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा प्रतिनिधी रितेश शिंदे, आकाश लांघी, अशोक बांगर, प्रताप आडेकर सोमनाथ मुऱ्हे, रामचंद्र शिंगाडे, प्रदिप बांबळे तसेच बिरसा ब्रिगेड चे तालुका अध्यक्ष एकनाथ तळपे सह सचिव विकास भाईक सचिव लक्ष्मण मदगे, योगेश शिंगाडे, मच्छिद्र वनघरे ,अभिषेक तळपे, मंगेश गावडे, सुभाष पितांबरे,ज्ञानेश्वर शिंदे,अरुण सप्रे,सागर खंडे,अरुण खंडे,शरद कडाळे,नारायण काळे संतोष भांगे, संदिप बांगर, संतोष सुपे, सुनिल सुपे, नितिन सुरकुले, बाळासाहेब बुढे, राहूल मदगे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.