मंचर येथे दिवसा घरफोडी ; ४५ हजारांचे दागिने लंपास

प्रतिनिधी : प्रमोद दांगट

मंचर ( ता. आंबेगाव ) येथील वृंदावन सोसायटीतील बंद फ्लॅटचे कुलूप तोडून कपाटातील पंचेचाळीस हजार पाचशे रुपये किंमतीचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले आहेत. याबाबत बेलनाथ सुखदेव टाके यांनी मंचर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.

दिलेल्या फिर्यादीनुसार बेलनाथ टाके हे आपल्या कुटुंबासमवेत मंचर येथील वृंदावन सोसायटी येथे फ्लॅट क्रमांक पाच मध्ये राहत असून (दि.२२) रोजी दुपारी दोन वाजता ते आपल्या कुटुंबासमवेत त्यांच्या जवळच पिंपळगाव फाटा येथे राहत असलेला आपला मुलगा सोमेश्वर याच्या घरी गणपती मूर्तीची स्थापना करण्यासाठी गेले होते. मुलाच्या घरी गणपती मूर्तीची स्थापना करून व जेवण करून ते सायंकाळी चार वाजता घरी आले असता त्यांना घराच्या दरवाजाला कुलूप दिसले नाही त्यावेळी त्यांनी घरात जाऊन पाहिले असता घरातील लोखंडी कपाट कुणीतरी उचकटून आत मधील सामान अस्ताव्यस्त करून कपाटातील सोन्याचे दागिने चोरून नेले होते यामध्ये सोन्याची अंगठी ,सोन्याची चैन ,सोन्याचे मणी मंगळसूत्र ,असे एकूण ४५ हजार ५०० रुपये किमतीचे दागिने चोरून नेले आहे.या प्रकरणी बेलनाथ सुखदेव टाके यांनी अज्ञात चोरट्याविरोधात मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील तपास मंचर पोलिस करत आहेत.

Previous articleघरासमोर वरातीचे आयोजन केल्याने वरबापावर गुन्हा दाखल
Next articleशेतकऱ्यांना कांदा बियाणे मुबलक व वाजवी दरात मिळावे-खासदार डॉ.अमोल कोल्हे