उरुळी कांचनमध्ये ४८ तासात नवीन ३८ रुग्ण

अमोल भोसले,उरुळी कांचन – प्रतिनिधी

उरुळी कांचनमध्ये ४८ तासात नवीन ३८ रुग्णांची भर, ग्रामपंचायतला ग्रामविकास अधिकारी नाही तर प्रशासकाकडे ६ गावांचा कार्यभार त्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प तर तालुका आरोग्य अधिकारी देईनात लक्ष अशी अवस्था ग्रामीण भागाची झाली आहे. तर काही नागरिक परस्पर खाजगी दवाखान्यात जाऊन तपासणी करुन घेत आहेत पण त्यांच्या अहवालाची नोंद सरकार दरबारी होत नाही त्यामुळे या बाधीतांच्या संख्येची आकडेवारी अधिकृतपणाने मिळत नाही व ते घरी आहेत का कोठे उपचार घेत आहेत हे पण आरोग्य कर्मचाऱ्यांना कळत नाही अशी ओरड सुरु आहे. त्यामुळे बाधितांची संख्या वाढण्याची व त्यांच्यामुळे संपर्कातील अन्य नागरिकांच्या आरोग्याला धोका वाढण्याची शक्यता वाढली आहे. आजपर्यंत उरुळी कांचनमधील अधिकृत बाधीतांची संख्या झाली आहे २४० त्यापैकी  १६६ रुग्ण बरे होऊन घरी आले आहेत तर ६ मयत झाले असून ६८ रुग्ण अक्टिव्ह आहेत.

उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकार्‍याची बदली झाल्याने व ग्रामपंचायतीच्या कार्यरत असलेल्या कार्यकारी मंडळाची मुदत २१ ऑगस्टला संपल्याने ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प झाला आहे,  या पार्श्वभूमीवर ऊरुळी कांचन गावातील कोरोणा बाधीत रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे यावर उपाययोजना करण्यासाठी सक्षम यंत्रणा गावात कार्यरत नसल्याचे चित्र समोर उभे आहे.

कोरोना बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना नेमके काय होणार या धास्तीने नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या रुग्णाची संख्या पाहता ही साखळी तुटणे अत्यंत आवश्यक आहे नवीन प्रशासकीय अधिका-यांनी लवकरच नवीन धोरणात्मक सामूहिक निर्णय घेतले पाहिजे. पालकमंत्री अजित पवार यांनी ग्रामीण भागातील रुग्णवाढीबद्दल व त्यांना मिळत असलेल्या सुविधांबद्दल लक्ष देऊन योग्य त्या सूचना द्याव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मात्र आरोग्य विभागाच्या, पंचायत समिती हवेलीच्या व महसूल विभागाच्या तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांकडून स्थानिक पातळीवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य ते निर्देश व साहित्य वेळेत मिळत नसल्याने ते रुग्णांना सक्षम आरोग्य सुविधा देण्याला असमर्थ ठरत आहेत ही बाब पुढे आली आहे. तालुका पातळीवरील सर्वच विभागाचे जबाबदार अधिकारी एकमेकाकडे बोटे दाखवून आपली जबाबदारी टाळताना दिसत आहेत.

Previous articleजुन्नर तालुक्यात आजपर्यंत ८०१ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ५३० रुग्ण उपचार घेऊन परतले घरी
Next articleघरासमोर वरातीचे आयोजन केल्याने वरबापावर गुन्हा दाखल