जुन्नर तालुक्यात आजपर्यंत ८०१ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ५३० रुग्ण उपचार घेऊन परतले घरी

नारायणगाव (किरण वाजगे)

जुन्नर तालुक्यात आज १८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून आजपर्यंत आढळलेल्या एकूण ८०१ रुग्णांपैकी ५३० रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत.
ओतूर येथे आज तीन कोरोणा पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून वडज येथे दोन तर नारायणगाव मध्ये आज केवळ १ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. आज कोरोनामुळे ओतूर येथील ८० वर्षीय वृद्ध महिलेचा तर बेल्हे येथील ६५ वर्षाच्या वृद्धाचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ वर्षा गुंजाळ यांनी दिली.

यामुळे जुन्नर तालुक्यांमध्ये निश्चितपणे चिंतेचे वातावरण पसरले आहे. गणेशोत्सवाची सुरुवात मोठ्या भक्तीभावाने व उत्साहात झाली असताना श्री गणेश स्थापनेच्या तिसऱ्या दिवशी तालुक्यात १८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यामुळे पुन्हा चिंता वाढली आहे. गणेशोत्सवाची तयारी करण्यासाठी अनेक नागरिक वेगवेगळ्या दुकानांमध्ये गर्दी करताना दिसत आहेत. सर्व नागरिकांनी कोरोना वाढीच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंग चे पालन करणे गरजेचे असून योग्य कारणासाठीच घराबाहेर पडावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

आज ओतूर येथे तीन तर वडज येथे दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तसेच नारायणगाव, उच्छील, खिलारवाडी, डिंगोरे, आळे, येडगाव, विठ्ठलवाडी-आगर, धोलवड, शिरोली बुद्रुक, आळेफाटा, बेल्हे, निमगाव सावा व जुन्नर येथे प्रत्येकी एक असे एकूण आज १८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निष्पन्न झाले आहेत.

विशेष म्हणजे गेल्या सहा दिवसात सुमारे १६३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण जुन्नर तालुक्यात निष्पन्न झाल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्यात आज पर्यंत ८०१ पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झाली आहे. यातील सुमारे ५३० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर २३५ अँक्टीव रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत एकूण ३६ रुग्णांचा कोरोणा मुळे मृत्यू झाला आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ उदय गोडे व वैद्यकीय अधिकारी डॉ वर्षा गुंजाळ यांनी दिली.

Previous articleदरोडा घालण्याच्या तयारीत असणाऱ्या दोन दरोडेखोरांना आळेफाटा पोलिसांनी केली अटक
Next articleउरुळी कांचनमध्ये ४८ तासात नवीन ३८ रुग्ण