आंबेगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतवर प्रशासकाची नेमणूक

Ad 1

प्रतिनिधी : प्रमोद दांगट

आंबेगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींच्या सरपंच व सदस्यांची मुदत संपत आली आहे .या मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्यात आल्याची माहिती गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी दिली .

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर मुदत संपलेल्या ग्रामपंचायत च्या निवडणुकाची तारीख जाहीर केली नसल्याने या ग्रामपंचायत तीवर प्रशासक नेमन्याने शासनाने आदेश दिले असून आंबेगाव तालुक्यातील मंचर ,शेवाळवाडी , अवसरी खुर्द येथे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आर.सी.हुजरे , पिपळगाव , एकलहरे , साकोरे , खडकी , लौकी ग्रामपंचायतीवर पंचायतसमितीमधील विस्तार अधिकारी आर.एन.मुठे , गावडेवाडी,भराडी,गिरवली , कोळवाडी/कोटमदरा,कोलदरा / गोणवडी , चिंचोली येथे शिक्षण विस्तार अधिकारी एस.एम . अभंग ,जवळे,काठापुर बुद्रुक आणि शिंगवे येथे कृषी विस्तार अधिकारी एस.एस.वांगसकर , शिरदाळे ,पेठ ,थुगाव,कारेगाव , महाळुगे पडवळ येथे पंचायत समिती विस्तार अधिकारी एस . डी.कांबळे ,लांडेवाडी / पिंगळवाडी,वळती,भागडी येथे कृषी विस्तार अधिकारी जे.जी . नाईकडे यांना प्रशासक म्हणुन नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती पठारे यांनी दिली आहे. या २९ ग्रामपंचायतींची मुदत शनिवार ( दि . २२ ) पर्यंत असून मुदत संपताच प्रशासकांची नियुक्ती केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.