पाच वर्षीच्या चिमुकल्याचा पाण्याच्या टाकीत पडून दुदैवी मृत्यू

Ad 1

प्नमोद दांगट, निरगुडसर : प्रतिनिधी

आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक येथील वायाळ मळा येथे अंगणात खेळत असताना जवळच असलेल्या सिमेंटच्या पाण्याच्या टाकीत पडून कार्तिक सचिन वायाळ या पाच वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची दुःखद घटना घडली आहे.या लहानग्याच्या अचानक जाण्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार (दि 23) रोजी सकाळी अकराच्या सुमारास कुटुंबातील सर्वजण घरी असताना कार्तिक हा घराबाहेर अंगणात खेळत होता. त्यानंतर तो बराच वेळ घरात न आल्याने त्याचा बाहेर शोध घेतला असता तो जवळच जनावरांच्या गोठ्याच्या बाजूला असलेल्या सिमेंटच्या पाण्याच्या टाकीत पडलेला दिसला त्यावेळी त्याला पाण्यातून बाहेर काढत मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला तो उपचारापूर्वीच मयत झाला असे सांगितले.पुढील तपास पोलीस करत आहे.

जाहिरात