राजेगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयाचे व बाजार गाळ्यांचे उदघाटन

Ad 1

दिनेश पवार-दौंड(प्रतिनिधी)

पुणे जिल्हा परिषद पुणे, ग्रामपंचायत राजेगाव तसेच लोकवर्गणीच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या राजेगाव ता.दौंड येथील नवीन ग्रामपंचायत कार्यालया तसेच बाजार गाळे या इमारतीचे उदघाटन पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन व माजी आमदार मा.रमेश आप्पा थोरात यांच्या हस्ते करण्यात आले‌यावेळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दौंड तालुका अध्यक्ष-मा.आप्पासाहेब पवार, पुणे जिल्हा परिषद सदस्य-मा.वीरधवल बाबा जगदाळे, पुणे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती सौ.सारीकाताई पानसरे, दौंड पंचायत समिती सदस्य-मा.नितीन भाऊ दोरगे,माजी सभापती-प्रकाश नवले,माजी उपसभापती-उत्तम आटोळे,सरपंच शीतल ताई लोंढे,माजी.पंचायत समिती सदस्य-नवनीत जाधव,युवक उपाध्यक्ष-उदय राजे भोसले, प्रवीण लोंढे,तालुका राष्ट्रवादी काँग्रेस चे माजी युवक अध्यक्ष-मिलिंद मोरे, तंटामुक्ती अध्यक्ष-राजेश राऊत,मलठण चे माजी सरपंच-नवनाथ थोरात, संकेत भोसले यासह ग्रामस्थ उपस्थित होते.