श्रीकृष्ण मंदिर महानुभाव शिक्रापूर प्रवेशद्वाराचे उदघाटन तसेच सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामीचा अवतार दिन अष्टशताब्दि वर्षानिमित्त सोहळा साजरा

Ad 1

अमोल भोसले, उरुळी कांचन – प्रतिनिधी

अखिल भारतीय महानुभाव परिषद अंतर्गत पुणे जिल्हा महानुभाव परिषद समिती यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीकृष्ण मंदिर महानुभाव आश्रम शिक्रापूर च्या वतीने सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामीच्या अवतार दिन अष्टशताब्दि वर्षानिमित्त सोहळा अखिल भारतीय महानुभाव परिषद कार्याध्यक्ष कविश्वर कुलाचार्य विद्वांसबाबा यांच्या उपस्थिती पार पडला तसेच स्थानमंदिरजीर्णोध्दाराचार्य यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा महानुभाव परिषद समिती अध्यक्ष मुकुंदराज कपाटेबाबा उपस्थित होते. कै.पुजा कृ.पंजाबी हिच्या स्मरणार्थ उभारलेल्या प्रवेशद्वाराचे उदघाटन व त्यावरील कळसाचे अनावर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पार पडले. अशी माहिती श्रीकृष्ण महानुभाव मंदिर संचालक तथा अखिल भारतीय महानुभाव परिषद सचिव कृष्णराज शास्त्री यांनी दिली.