श्री नवनाथ तरुण मिञ मंडळ आयोजीत आरोग्य उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

नारायणगाव (किरण वाजगे)

दरवर्षी धुमधडाक्या मध्ये व मोठ्या उत्सवामध्ये साजरा होणारा गणेशोत्सव हा आरोग्य उत्सव ठरवा असे आवाहन नारायणगाव चे नवनिर्वाचित सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी नुकतेच केले आहे. त्यानुसार नारायणगाव येथील डिंबळे मळा वाजगे मळा येथील श्री नवनाथ तरुण मित्र मंडळाने यावर्षी आरोग्य उत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे.

श्री नवनाथ तरुण मिञ मंडळ आयोजीत आरोग्य उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

त्यानुसार  मंडळाच्यावतीने सँनिटायझर आणि मास्कचे वाटप करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने सॅनिटायझर व मास्कचे पँकींग मोठ्या प्रमाणावर केले आहे.  या सर्व वस्तू मंडळाचे देणगीदार, सभासद, ढोल वादक, आसपासची मंडळे, कार्यकर्ते तसेच मंडळाच्या शेवटच्या घटका पर्यंत या आरोग्य विषयक वस्तू पोहचवल्या जाणार आहेत. आजच्या दिवसांत या वस्तूची गरज ओळखून या वर्षिचा गणेश उत्सव हा आरोग्य उत्सव म्हणुन साजरा होणार आहे. अशी माहिती मंडळाचे पदाधिकारी ऋषी वाजगे यांनी दिली.

Previous articleबोरीऐंदी येथे अपंग मुख्याध्यापकाचे सेवेत समावून घेण्यासाठी आमरण उपोषण
Next articleवाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून विशाल पवार यांनी महाळुंगे कोविड सेंटर केली मदत