बोरीऐंदी येथे अपंग मुख्याध्यापकाचे सेवेत समावून घेण्यासाठी आमरण उपोषण

अमोल भोसले, उरुळी कांचन – प्रतिनिधी

न्यायालय आणि शिक्षण उच्च आधिकारी यांनी लेखी आदेश रासकर सर याना रुजू करून घ्यावे. असा देऊनही संस्था चालकाने या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.अधिक माहिती अशी, बोरीऐंदी येथील श्रीनाथ शिक्षण संस्थेच्या शिवराम कुदळे विद्यालयात शामराव रासकर हे सन १९९७ पासून मुख्याध्यापक म्हणून  काम करीत होते, सन २०१० मध्ये त्यांना अपंगत्व आल्याने त्यांचा उपचार चालू असताना त्यांना नोकरीतून कमी करण्यात आले.

दरम्यान आजार वाढत जाऊन त्यांना अपंगत्व आले. ८९ टक्के अपंगत्व आपले तसा  अपंगत्वाच  दाखला मिळाल्यावर रासकर यांनी रीतसर पणे शाळा न्यायाधिकरण यांचेकडे अपील केले.याचा निकाल रासकर यांचे बाजूने लागलेवर  रासकर याना रुजू करुन घ्यावे. असा शिक्षण खात्याचा आदेश संस्थेला दोन वर्षांपूर्वी येऊन यासाठी रासकर यांनी उपोषण करुनही त्यांना सेवेत घेतले नाही.या नंतर रासकर यांनी उच्च न्यायालयात अपील केले. याचा निकाल रासकर यांचे बाजूने लागून त्यांना शाळेवर रुजू करुन घेण्याचा निकाल न्यायालयाने दिला. याबाबत मा, शिक्षण अधिकारी यांनीही रासकर याना रुजू करण्याचे आदेश संस्थेला दिले.तरीही संस्थाचालक रुजू करून घेत नसून न्यायालयीन आदेशाला या मनमानी पणे केराची टोपली दाखवली आहे. यासर्व प्रकरणी दाद लागावी ,म्हणून अपंग आणि विकलांग शिक्षक रासकर हे उपोषणास बसले आहेत.
याबाबत माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष चव्हाण सर यांनीउपोषण स्थळी भेट देऊन संस्था चालक याना योग्य कायदेशीर माहिती देऊन न्यायालय आदेशाचे पालम करून रासकर याना रुजू करून घेणे आवश्यक असल्याचे नमूद केले, यावर संस्था अध्यक्ष मुरलीधर भोसेकर यांनी रासकर यांना अन्य शाळेत पाठवण्याचा आग्रह चव्हाण यांचे कडे बोलून दाखविला.
रासकर यांचे उपोषणास येथील आजी माजी सरपंच, माजी विद्यार्थी, शिक्षक संघटना ,भारत मुक्ती मोर्चा, यांनी पाठिंबा व्यक्त केला आहे.

संस्था अध्यक्ष हे सातत्याने रासकर यांचेवर अन्याय करीत असून न्यायालय आदेशाने रासकर याना न्याय द्यावा, अन्यथा आम्ही शाळेला ताळेबंदी करु असा इशारा राजेंद्र तावरे, एम.जी.शेलार आणि महादेव यादव या माजी सरपंच यांनी दिला आहे.

Previous articleरेकॉर्डवरील गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई
Next articleश्री नवनाथ तरुण मिञ मंडळ आयोजीत आरोग्य उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात