रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई

Ad 1

दिनेश पवार, दौंड प्रतिनिधी-गणेशोत्सव शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी दौंड पोलिसांनी कंबर कसली असून, गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे आहे. गणेशोत्सवात कुठलाही अनुचित प्रकार अथवा समाजविघातक घटना टाळण्यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांना तडीपार करण्याची कारवाई चालू आहे. आतापर्यंत पंधरा जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.

दिपक रमेश विधाते,पंकज दिलीप निमजे,जॉय सतीश नवगिरे,शाहिद मोहम्मद शेख,राहुल चन्नाप्पा कमप्लीकर,अजय हनुमंत चन्नूर,लिंगाप्पा अमात्य चूनुर,सोनू नामदेव शेटे,मनोज अण्णाराय नरळे,सुरज विजय होसमाने,सागर अरुण कांबळे,लखन जीवन सरवय्या,सागर कैलास अल्लाट,सुशांत राजू कांबळे,विशाल प्रकाश काटकर अशी तडीपार केलेले गुन्हेगारांची नावे आहेत.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तसेच विसर्जन मिरवणुकीत त्रासदायक ठरणाऱ्या दोन किंवा दोनपेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल झालेल्या २०१९ मध्ये चाळीस लोकांना एक वर्षांकरिता तडीपार करण्यात आलेले होते.२०२० मध्ये सुद्धा तडीपारचे प्रस्ताव रवाना झाले होते .तडीपारीच्या प्रस्तावानूसार पोलीस अधीक्षकांनी १५ लोकांना तडीपार केलेले आहे. सदर गुन्हेगारांवर वर मारामारी,जबरी चोरी, विनयभंग, दारूविक्री, दंगल करणे यासारखे गुन्हे दाखल आहेत.सदर गुन्हेगार परत विनापरवाना दौंड मध्ये आढळून आल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल तसेच त्यांच्या वर्तनात बदल झाला नाही तर झोपडपट्टी दादा कायद्या अंतर्गत किंवा संघटित गुन्हेगारी कायद्या अंतर्गत त्यांना जेलमध्ये पाठवण्यात येईल,पोलिसांचे बारीक लक्ष असेल सदर कारवाई पोलीस निरीक्षक- श्री सुनील महाडिक ,सहाय्यक पोलीस निरीक्षक -ऋषिकेश अधिकारी, पोलीस नाईक- बोराडे ,वारे पोलीस शिपाई- वलेकर, सहाय्यक पोलीस फौजदार- भाकरे ,पोलीस हवालदार -शिंगाडे,पोलीस हवालदार- आसिफ शेख ,पांडुरंग थोरात, हिरवे, पोलीस शिपाई – गुंजाळ, वाघ,गाढवे,गवळी, अमोल देवकाते यांनी केली आहे.अशी माहिती दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक यांनी दिली.

जाहिरात