रांजणी येथील २१ वर्षीय कॉलेज तरुणीचा विनयभंग

Ad 1

प्रमोद दांगट, प्रतिनिधी

आंबेगाव तालुक्यातील रांजणी (कारफाटा) येथील एका २१ वर्षीय कॉलेज तरुणीचा विनयभंग करून तिच्या कुटुंबीयांना मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरोधात मंचर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आकाश संजय उबाळे ( रा.रांजणी ) ,मयूर संजय विटकर ,रोहित मदन कुरमे ( दोघे रा.पिंपरी , पुणे ) ,धनंजय वाघ ( रा.कारमळा रांजणी ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत .

मिळालेल्या माहितीनुसार , आकाश उबाळे हा फिर्यादी तरुणीच्या घरी दूध घालण्यासाठी जात होता त्यामुळे तरुणीची व त्यांची ओळख झाली होती. रविवार (दि. १६ रोजी) रात्री ८ च्या दरम्यान तरुणी घरात असताना आकाश उबाळे हा तरुणीच्या घरी गेला व तरुणीस तु मला आवडतेस मला तुझ्याशी लग्न करायचे आहे असे म्हणून तिचा हात धरून बाहेर ओढू लागला.त्यावेळी तरूणीने आरडा ओरडा केला असता तिचे आई-वडील ,चुलते बाहेर आले त्यावेळी बाहेर उभे असलेले मयूर विटकर,रोहित कुरमे, भूषण वाघ,या आकाश उबाळे च्या मित्रांनी तरुणीच्या आई-वडिलांना धक्काबुक्की करत मारहाण केली तसेच आकाश उबाळे यांनी तेथे पडलेल्या काठीने तरुणीच्या चुलत्याच्या उजव्या हातावर काठीने मारले. संबंधित तरुणीने मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील तपास मंचर पोलीस करत आहे.