पुणे नाशिक महामार्गावर कंटेनर व टँकरचा भीषण अपघात

प्रमोद दांगट,निरगुडसर : प्रतिनिधी

पुणे नाशिक महामार्गावर मोरवाडी(ता.आंबेगाव) येथे मालवाहतूक कंटेनर व पेट्रोल डिझेल वाहतूक करणारा टँकर यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात टँकर चालक ठकाजी शेवाळे( रा.लांडेवाडी ता.आंबेगाव  ) हे गंभीर जखमी झाले असून अपघातास कारणीभूत ठरलेला कंटेनरचालक पळून गेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ,रविवार (दि १६) रोजी पहाटेच्या सुमारास टँकर चालक ठकाजी शेवाळे हे आपला एम. एच.१४ सी. पी.९२६८ हा टँकर पुणे नाशिक महामार्गावरून मंचर येथून पुण्याच्या बाजूने घेऊन जात असताना भोरवाडी गावचे हद्दीत पुलाजवळ पुण्याच्या बाजूने मंचर कडे येणाऱ्या माल वाहतूक ट्रक एच. आर.४७ डी. झेड.०६९७ याने टँकरला समोरासमोर धडक दिल्याने मोठा अपघात झाला आहे.

या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून टँकर चालक ठकाजी शेवाळे गंभीर जखमी झाले आहे या अपघातास कारणीभूत ठरलेला कंटेनर चालक पळून गेला आहे.प्रमोद थेऊरकर यांनी अज्ञात कंटेनर चालकांविरोधात मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.अपघाताचा पुढील तपास मंचर पोलिस करत आहेत

Previous articleउरळी कांचन मध्ये वखार व्यावसायिकाला बेदम मारहाण
Next articleरांजणी येथील २१ वर्षीय कॉलेज तरुणीचा विनयभंग