उरळी कांचन मध्ये वखार व्यावसायिकाला बेदम मारहाण

Ad 1

अमोल भोसले, उरुळी कांचन – प्रतिनिधी

उरुळी कांचन (ता.हवेली) येथील एका लाकडी वखारीचा व्यावसाय करणाऱ्या व्यापार्‍यावर दुपारी सव्वा तीनच्या सुमारास चार अज्ञातांनी दुकानात शिरून हल्ला करून जखमी करण्याचा प्रकार घडलेला आहे, मात्र परिसरात एका व्यापाऱ्यावर गोळीबार झाल्याची अफवा जोरात पसरून उरुळी कांचन परिसरातील वातावरण काही काळ तंग झाले होते.

याबाबत नागनाथ रामा गायकवाड (वय ५५ . उरुळीकांचन )यांनी उरळीकांचन पोलिस दूर क्षेत्रात चार अज्ञात इसमांच्या विरुद्ध रीतसर गुन्हा दाखल केला आहे. चार अज्ञात इसमांनी त्याच्या तुळजाभवानी टिंबर मार्केट या दुकानात अनधिकृत पणे प्रवेश करून काहीही कारण नसताना भांडण्यास सुरुवात करून मारहाण करण्यास सुरुवात केली व दोन्ही पायांच्या नडग्यांवर हातात असलेल्या कोणत्यातरी हत्याराने मारहाण करून गंभीर दुखापत केली आहे अशी तक्रार दिली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली. नागनाथ रामा गायकवाड यांना लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, अज्ञात आरोपींविरुद्ध कलम ३२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून उरुळी कांचन पोलीस दूर क्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन चौधरी व पोलीस हवालदार सचिन पवार अधिकचा तपास करीत आहेत.