दौंड मधील कोरोना परिस्थिती चिंताजनक शहर सह ग्रामीण भागात दोन दिवसात 70 रुग्ण

दिनेश पवार-दौंड(प्रतिनिधी)

दौंड शहर व ग्रामीण भागात कोरोना ची संख्या पुन्हा वाढू लागली आहे,गेले काही दिवस शहरात व ग्रामीण भागात क्वचित एक-दोन रुग्ण आढळत होते यामुळे आता कोरोना दौंड मधून समूळ नष्ट होणार असा समज दौंडकरांचा झाला होता यामुळे दिलासादायक वातावरण निर्माण झाले होते, मात्र दिनांक 18 ऑगस्ट रोजी दौंड शहर व ग्रामीण भागात कोरोना चे तब्बल 27 रुग्ण पॉजीटिव्ह आल्याची माहिती दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक: डॉ.संग्राम डांगे यांनी दिली.तर 19 ऑगस्ट रोजी ग्रामीण भागात 41 रुग्ण पॉजीटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक रासगे यांनी दिली

उपजिल्हा रुग्णालय दौंड तर्फे दिनांक 17 ऑगस्ट 2020 रोजी एकूण 160 जणांचे रिपोर्ट तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्याचा अहवाल दिनांक 18 ऑगस्ट रोजी प्राप्त झाला यामध्ये एकूण 27 रुग्ण पॉजीटिव्ह व 133 रुग्णाचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे डॉ.डांगे यांनी सांगितले.यामध्ये 20 पुरुष व 7 महिला चा समावेश आहे, SRPF गट क्रमांक 5 मध्ये 2,PTS नानविज -1,जगदाळे वस्ती-2,दत्तकला-1,गोपाळ वाडी रोड-4,चोरमले वस्ती-3,शालिमार चौक-2,गोपाळ वाडी,बंगला साईड,चंद्रभागा नगर,भोईटे नगर,बोरावके नगर,बोरिपारधी,फराटे गल्ली,वरद विनायक सोसायटी,साठे नगर,खाजा वस्ती,पिंपळ गाव,आणि गार या गावात प्रत्येकी एक रुग्ण आढळुन आलेला आहे, हे सर्व रुग्ण 18 ते 82 या वयोगटातील आहेत.दिनांक 18 ऑगस्ट रोजी पुन्हा 33 जणांचे नमुने पाठवले असता यातील दौंड शहर एक भवानी नगर व शेंडेवस्ती 1 असे दोन जणांचे नमुने पुन्हा पॉजीटिव्ह आले आहेत, हे 20 ते 45 वयोगटातील पुरुष आहेत.

तर दिनांक 19 ऑगस्ट रोजी दौंड ग्रामीण भागात तब्बल 41 रुग्ण पॉजीटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक रासगे यांनी दिली यामध्ये पत्रा कंपनी केडगाव-9, केडगाव-1,पाटस-2,यवत-3,भांडगाव – 2,बोरिपारधी-1,नाथाची वाडी-1,राहू-3,चौफुला-1,खडकी-2,स्वामी चिंचोली-2,कुरकुंभ-6,बोरिबेल-1,वासुंदे-1,राजेगाव-1 येथील रुग्ण पॉजीटिव्ह आले आहेत,एकूण 99 नमुने तपासणीसाठी पाठवले होते त्यातील 41 पॉजीटिव्ह आले आहेत,यामध्ये 34 पुरुष व 7 महिला चा समावेश आहे, हे सर्व 10 ते 60 वयोगटातील आहेत

दौंड शहर सह ग्रामीण भागात दोन दिवसात तब्बल 70 रुग्ण पॉजीटिव्ह सापडल्याने मोठे संकट निर्माण झाले आहे.

गेली काही दिवस शांत असणारे वातावरण चिंताजनक बनू लागले आहे, परंतु नागरिकांनी संयम पाळणे गरजेचे आहे, आरोग्य विभाग,पोलीस प्रशासन यांनी सांगितलेली उपाययोजना राबवून ही परिस्थिती आटोक्यात आणू शकतो

Previous articleघरादारावर जणू तुळशी पत्र ठेवून काम करणाऱ्या प्रयोगशाळा वैज्ञानिकांचे कार्य कौतुकास्पद
Next articleमागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षणासाठी सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा .अन्यथा नागपूर ते मुंबई आरक्षण बचाव मार्च काढणार -गौतम कांबळे