उरुळी कांचनमध्ये ४८ तासात नवीन ३४ रुग्णांची वाढ

अमोल भोसले, उरुळी कांचन – प्रतिनिधी

उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकार्‍याची बदली झाल्याने व ग्रामपंचायतीच्या कार्यरत असलेल्या कार्यकारी मंडळाची मुदत २१ ऑगस्टला संपत असल्याने ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प झाला आहे या पार्श्वभूमीवर ऊरूळीकांचन गावातील कोरोणा बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने नागरिकांच्या धास्तीचे वातावरण निर्माण झाले असताना मात्र आरोग्य विभागाच्या तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांकडून स्थानिक पातळीवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य ते निर्देश व सहकार्य मिळत नसल्याने ते रुग्णांना आरोग्य सुविधा देण्यापासून असमर्थ ठरत आहेत ही बाब पुढे आली आहे. तालुका पातळीवरील जबाबदार अधिकारी एकमेकाकडे उंगली निर्देश करून आपली जबाबदारी टाळतानाचे चित्र दिसत आहे

उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत मागील ४८ तासांच्या काळात कोरोनाचे ३४ नवीन रुग्ण आढळुन आले आहेत. या ३४ रुग्णामुळे उरुळी कांचन हद्दीतील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या २०६ वर पोचली आहे तर २०६ रुग्णांच्यापैकी १३६ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असुन, ६५ रुग्ण पुर्व हवेलीमधील विविध रुग्णालयात उपचार घेत असून सहा रुग्णांचा बळी गेला असल्याची माहिती, उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आरोग्य अधिकारी डॉ.सुचेता कदम व डॉ.संदीप सोनवणे यांनी दिली आहे. आज सापडलेल्या २४ रुग्णांपैकी जण बाधीतांच्या संपर्कातील आहेत .

आजच्या २४ जणातील सुमारे १७ जण हे बाधीतांच्या संपर्कातील आहेत यावरून हेच सिद्ध होते की बाधीतांच्या कुटुंबातील लोकांना तातडीने विलगीकरण गरजेचे आहे,:आपण जर बाधीतांच्या संपर्कातील लोकांना तातडीने नियमित विलगीकरण केले नाही तर ही रुग्ण संख्या वाढत जाणार आहे. घरच्या घरी विलग होण्यासाठी सर्वांच्याच घरी शासनाच्या नियमानुसारच्या सोई आहेतच असे नाही म्हणून शासनाने परिसरातील काही रुग्णालये तसेच काही संस्था अधिग्रहित करून ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या ताब्यात दिलेल्या आहेत त्यानुसार निसर्गोपचार आश्रम सारखी संस्था ताब्यात देऊनही त्याचा उपयोग उरुळी कांचन सारख्या शहराला होताना आज दिसत नाही केवळ कागदी घोडे नाचविण्यात तालुका आरोग्य प्रशासन कार्यरत असल्याने उरुळी कांचन ला गरजू रुग्णांना सोयीसुविधा मिळण्यास अडचण निर्माण झाली असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे.

ग्रामपंचायत प्रशासन ठप्प व आरोग्य विभाग रुग्ण वाढीपुढे हतबल झाल्याचे चित्र निर्माण झाले असून मागील तीन दिवसापासुन रुग्ण वाढीचे प्रमाण चांगलेच वाढल्याने उरुळी कांचन परीसरात पुन्हा कोरोना प्रादुर्भावाने डोके वर काढल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Previous articleदौंड मध्ये कोरोना चा आकडा पुन्हा वाढला
Next articleबिबवेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांचा नमो ग्रुप फाउंडेशनच्या वतीने ‘कोरोना योद्धा’पुरस्कार देऊन गौरव