दौंड मध्ये कोरोना चा आकडा पुन्हा वाढला

दिनेश पवार-दौंड(प्रतिनिधी)

दौंड शहर व ग्रामीण भागात कोरोना ची संख्या पुन्हा वाढू लागली आहे,गेले काही दिवस शहरात व ग्रामीण भागात क्वचित एक-दोन रुग्ण आढळत होते यामुळे आता कोरोना दौंड मधून समूळ नष्ट होणार असा समज दौंडकरांचा झाला होता यामुळे दिलासादायक वातावरण निर्माण झाले होते, मात्र दिनांक 18 ऑगस्ट रोजी दौंड शहर व ग्रामीण भागात कोरोना चे तब्बल 27 रुग्ण पॉजीटिव्ह आल्याची माहिती दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक: डॉ.संग्राम डांगे यांनी दिली.

उपजिल्हा रुग्णालय दौंड तर्फे दिनांक 17 ऑगस्ट 2020 रोजी एकूण 160 जणांचे रिपोर्ट तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्याचा अहवाल दिनांक 18 ऑगस्ट रोजी प्राप्त झाला यामध्ये एकूण 27 रुग्ण पॉजीटिव्ह व 133 रुग्णाचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे डॉ.डांगे यांनी सांगितले.

यामध्ये 20 पुरुष व 7 महिला चा समावेश आहे, SRPF गट क्रमांक 5 मध्ये 2,PTS नानविज -1,जगदाळे वस्ती-2,दत्तकला-1,गोपाळ वाडी रोड-4,चोरमले वस्ती-3,शालिमार चौक-2,गोपाळ वाडी,बंगला साईड,चंद्रभागा नगर,भोईटे नगर,बोरावके नगर,बोरिपारधी,फराटे गल्ली,वरद विनायक सोसायटी,साठे नगर,खाजा वस्ती,पिंपळ गाव,आणि गार या गावात प्रत्येकी एक रुग्ण आढळुन आलेला आहे, हे सर्व रुग्ण 18 ते 82 या वयोगटातील आहेत.

गेली काही दिवस शांत असणारे वातावरण चिंताजनक बनू लागले आहे, परंतु नागरिकांनी संयम पाळणे गरजेचे आहे, आरोग्य विभाग,पोलीस प्रशासन यांनी सांगितलेली उपाययोजना राबवून ही परिस्थिती आटोक्यात आणू शकतो

Previous articleमाझ्या शिक्षक बांधवांना स्वजिल्ह्यात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार-निर्मला पानसरे
Next articleउरुळी कांचनमध्ये ४८ तासात नवीन ३४ रुग्णांची वाढ