माझ्या शिक्षक बांधवांना स्वजिल्ह्यात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार-निर्मला पानसरे

Ad 1

पुणे– गेली अनेक वर्ष बदलीने स्वजिल्ह्यात येण्यासाठी आतुर असणार्‍या शिक्षक बांधवांना सर्वतोपरी मदत करण्याचे सूतोवाच पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निर्मला पानसरे यांनी केले.

पानसरे यांनी सांगितले “भले यासाठी पदविधर शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्ताराधिकारी बढती (प्रमोशन), बिंदूनामावली (रोष्टर) आदी जे जे करणे शक्य आहे ते अधिकार्‍यांच्या साथीने करुन जिल्ह्यात नियमानुसार जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करु, प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्याशी सविस्तर चर्चा करुन याकामी त्यांचे मार्गदर्शन व सहकार्य घेऊ.पुणे जिल्हा परिषद (प्राथमिक) शिक्षणाधिकारी सुनिल कुर्‍हाडे यांच्याबरोबर यासंबंधी सखोल चर्चा झाली.

यावेळी आंतरजिल्हा बदली खुला प्रवर्ग संघाचे प्रतिनीधी शरद राळे ( अध्यक्ष -राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान शिक्षक आघाडी पुणे) जुन्नर तालुका शिक्षक प्रतिनिधी तुषार डुंबरे, राज्य प्रा. शिक्षक संघाचे मा.उपाध्यक्ष संजय राळे, खेड तालुका शिक्षक संघाचे मा.अध्यक्ष धर्मराज पवळे आदी शिक्षक प्रतिनिधीनी उपस्थित होते.