दिलासादायक-जुन्नर तालुक्यात ६२१ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ४७४ रुग्ण बरे होऊन घरी

नारायणगाव (किरण वाजगे)-जुन्नर तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या नारायणगाव मध्ये आज तब्बल नऊ व वारूळवाडी येथे २ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

गावातील नारायणवाडी, कोल्हेमळा, शेटेमळा, वारूळवाडी परिसरात हे रुग्ण आढळले आहेत. अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ वर्षा गुंजाळ यांनी दिली.
जुन्नर तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६२१ एवढी वाढली असताना आज पर्यंत ४७४ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण पूर्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ही दिलासादायक बातमी आहे. दरम्यान आज तालुक्यामध्ये १५ पॉझिटिव्ह रुग्ण निष्पन्न झाले आहेत.

आजपर्यंत जुन्नर तालुक्याची एकूण कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांंची संख्या ६२१ एवढी झाली असून आजपर्यंत २७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  यापैकी ४७४  रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १२६ एवढी आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ उमेश गोडे व डॉ वर्षा गुंजाळ यांनी दिली.

आज नारायणगाव येथे नऊ वारूळवाडी येथे दोन जुन्नर येणेरे धालेवाडी व इंगळुन येथे प्रत्येकी एक असे आज एकूण १५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
दरम्यान सर्वांनी सोशल डिस्टंसिंग चे पालन करावे. घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा. अशा सूचना प्रशासनाकडून दिल्या जात आहे. प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे सर्वांनी काटेकोर पालन करावे असे आवाहन देखील प्रशासनाच्या वतीने वारंवार केले जात आहे.

Previous articleभाजप च्या पुणे जिल्हा महिला अध्यक्ष पदी कांचन कुल यांची निवड
Next articleकोरोना महामारीच्या संकटामुळे गणेशोत्सवातील लाखोंची उलाढाल मंदावली